Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे 'विनोद कांबळी'. क्रिकेटच्या मैदानावर दमदार सुरुवात केल्यानंतर त्याच्या कारकिर्दीला वेगळीच वळणं मिळाली. विनोद कांबळीचा हाच प्रवास आता ओटीटीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. विनोद कांबळीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या वेब सीरिजचं नाव ‘कांबळी’ असं असणार आहे. दिग्दर्शक अभिजित देशपांडे या प्रोजेक्टवर २०१९ पासून काम करत असल्याची माहिती दिली गेली. ही वेब सीरिज ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, यूट्यूब चॅनेलवर या सीरिजचे पोस्टरही प्रदर्शित केले आहे.



विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील मैत्री


विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची मैत्री क्रिकेटविश्वात नेहमीच चर्चेत राहिली. १९८८ मध्ये हॅरिस शिल्ड स्पर्धेत दोघांनी मिळून ६६४ धावांची विक्रमी नाबाद भागीदारी केली होती. रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा प्रवासही सीरिजमध्ये पाहायला मिळू शकतो. कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीतील यशाबरोबरच त्यानंतर आलेल्या अडचणी आणि आयुष्यातील चढ-उतारांवरही या सीरिजमध्ये प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे.



सचिनसोबतच्या मैत्रीत आलेला दुरावा


कांबळी आणि सचिनच्या मैत्रीतील चढ-उतारांचाही या वेब सीरिजमध्ये दाखवण्याची शक्यता आहे. सचिनच्या निवृत्तीच्या वेळी केलेल्या भाषणात त्याने आपलं नाव न घेतल्याने विनोद कांबळीने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दोघांच्या नात्यात काही काळ दुरावा निर्माण झाल्याची चर्चा झाली होती.



क्रिकेटर ते अभिनेता...


विनोदने क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावून पाहण्याचं ठरवलं. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनर्थ’ या चित्रपटात त्याने अभिनेता संजय दत्तसोबत काम केलं होतं. त्यामुळे क्रिकेटपासून अभिनयापर्यंतचा त्याचा प्रवासही या वेब सीरिजचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.


विनोद कांबळीच्या आयुष्यातील अनेक घटना आणि किस्से विविध कारणासाठी आजही चर्चेत आहेत. त्यामुळे त्याच्या आयुष्याची ही कहाणी पडद्यावर नेमकी कशी मांडली जाते, कांबळी अन् सचिन यांच्या भूमिका कोण साकारणार? चित्रपटापेक्षा वेब सिरिज हे माध्यम निवडल्याने काय फरक पडणार या सर्वच गोष्टींकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत