Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल तसेच त्यांच्या पत्नीला काही महिन्यांपूर्वी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामिनावर सुटका झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने आयोजित केलेल्या एका जंगी पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.



'मुंबई से आया मेरा दोस्त...' गाण्यावर डान्स; VIDEO चर्चेत


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्य उत्साहात नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यात नोटांचे मोठे हार दिसून येत आहेत. "मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो..." या लोकप्रिय हिंदी गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोष करताना दिसत असल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी आरोपी कुटुंबाच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गंभीर गुन्ह्याच्या आरोपांनंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरही अशा प्रकारे सार्वजनिक स्वरूपात उत्सव साजरा केल्याने नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.







जामिनानंतरचा जल्लोष वादाच्या भोवऱ्यात


विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला होता. पुण्यातील पोर्शे अपघातात दोन तरुण आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता आणि या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत जामिनावर सुटका झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या कथित पार्टीमुळे पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंब चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी पीडितांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करत संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.



सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया


व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक युजर्सनी, "अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना अद्याप पूर्ण न्याय मिळालेला नाही, अशावेळी आरोपी कुटुंबाचा असा जल्लोष योग्य आहे का?" असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी या व्हिडिओला असंवेदनशीलतेचे उदाहरण म्हटले असून, तर काहींनी पैशांच्या जोरावर प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही केली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात या प्रकरणावर आणखी चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात