Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाली. या वायू गळतीमुळे अमित कुमार (२८, रा. बिहार) आणि कल्पेश वांद्रे या दोन कामगारांचा मृत्यू झाला. गॅस गळतीचा त्रास झाल्यामुळे ३४ कामगारांची तब्येत बिघडली. तब्येत खालावलेल्या कामगारांवर महाड आणि मुंबई येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्यांपैकी एका कामगाराची तब्येत जास्तच खालावली हे. त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. गॅस गळतीचा परिणाम कंपनीतील कामगारांसह परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही जाणवला. गॅसमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचेही सांगण्यात येत आहे.



घटनेची माहिती मिळताच फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महाडचे प्रभारी डीवायएसपी शशिकांत पवार यांनी सकाळी दहा वाजता कंपनीला भेट दिली. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली. महाड औद्योगिक वसाहतीचे अधिकारीही घटनेचा तपास करीत असून, गॅस गळतीचे नेमके कारण आणि सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटी याबाबत चौकशी सुरू आहे.



महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार गॅस गळतीच्या घटना घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील

Ethanol Free Petrol Finder : इथेनॉलमुक्त पेट्रोल हवंय? घरबसल्या असा शोधा तुमच्या जवळचा पंप!

नवी दिल्ली : देशभरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर सध्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. केंद्र

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Sonia Gandhi : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून सोनिया गांधींविरोधात तक्रार दाखल

कर्नाटक : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित