डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. चंडीगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मेर तलाव येथे १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज तब्बल २४ तासांहून अधिक काळ फडकत राहिल्याचे निदर्शनास आले. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत राष्ट्रध्वज न उतरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक ...
मेर तलाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामसेविका तसेच संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरविण्याची आवश्यक कार्यवाही संबंधितांकडून करण्यात आली नसल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आले. तब्बल २४ तासांनंतरही राष्ट्रध्वज फडकत असल्याचे आढळल्याने नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाली. या वायू गळतीमुळे अमित कुमार ...
राष्ट्रध्वज हा देशाची अस्मिता, अखंडता, एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंधित बाबतीत एवढी गंभीर निष्काळजी कशी घडली? ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वज उतरविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती? संबंधितांनी आपली जबाबदारी पार पाडली का नाही? याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकाराची पंचायत समिती डहाणू प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोष निश्चित करून पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिली. त्यामुळे आता संबंधितांवर नेमकी कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रध्वजासारख्या राष्ट्रीय प्रतीकाच्या सन्मानाबाबत कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा सहन केला जाऊ नये. संबंधितांची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
कर्नाटक : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील मंगळूर येथील उर्वा पोलीस ठाण्यात ...
...............
“मेर तलाव येथे राष्ट्रध्वज २४ तासांहून अधिक काळ फडकत राहिल्याच्या प्रकाराची पंचायत समितीने गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. प्राप्त अहवाल व स्पष्टीकरणाची पडताळणी करून पुढील प्रशासकीय कारवाईसाठी उद्या जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंधित बाब असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.” — पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, पंचायत समिती डहाणू