Wednesday, May 27, 2026

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध समस्या यांमुळे अनेकांचे वजन वाढते, तर काहींचे कमी होते. अनेकांना सततचे बैठे काम, अयोग्य आहार आणि अपूर्ण झोप अशा अनेक गोष्टींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात आणि जीवनशैलीत बरेच बदल करावे लागतात यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे असते. अनेकदा कलाकारही त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीबद्दल मुलाखतींमधून व्यक्त होतात. त्यांच्या आहारात कोणते पदार्थ असतात, ते कोणते व्यायाम करतात, ते किती तासांची झोप घेतात, साखर किती प्रमाणात खातात या आणि अशा अनेक गोष्टी ते शेअर करतात. अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून ते विविध व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांच्या विविध प्रश्नांना ते उत्तरे देत असतात. त्यांच्या स्कीन केअर रुटिनबद्दलही सांगतात.

नेमक काय महणाली जान्हवी कपूर ?

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने एका मुलाखतीत तिने तिचे वजन कमी कसे केले, याबद्दल वक्तव्य केले आहे. मीडियाशी बोलताना ती म्हणाली, “मी तुम्हाला वजन कमी करण्याची सर्वात चांगली टीप देईन. तुम्ही राम चरण सरांबरोबर डान्स करा, अर्ध्या दिवसात बारीक दिसाल, तुमचे वजन कमी होईल.” जान्हवी लवकरच पेड्डी (peddi ) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर राम चरण प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना तिने हे वक्तव्य केले आहे. तसेच त्याच्याबरोबर डान्स करताना तुमचे वजन कमी होईल इतकी ते मेहनत करतात, अशा आशयाचे वक्तव्यही केले

फिटनेस आणि पिलाटेस एक्स्पर्ट म्हणून काम करणाऱ्या डॉ. वजल्ला श्रावणी डान्स करून वजन घटवण्याबद्दल म्हणाल्या की, वेगात डान्स केला तर काही तासातच सरासरी व्यक्तीच्या ३५० ते ६०० कॅलरी बर्न होऊ शकतात. हे त्या व्यक्तीचे वजन, डान्सची तीव्रता आणि स्टेप्स किती सातत्याने केल्या जातात यावर अवलंबून असते. त्या पुढे म्हणाल्या की, डान्समध्ये सतत पायांची हालचाल आणि शरीराच्या वरच्या भागाचा वापर होत असल्यामुळे संपूर्ण वेळ हृदयाचे ठोके वाढलेले राहतात, त्यामुळे अनेक कार्डिओ कसरत प्रमाणेच कॅलरी बर्न होतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >