Maharashtra Sadan : 'दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा'

नवी दिल्ली : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान नवीन व जुने महाराष्ट्र सदन येथील विविध प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागातील अधिकारी व अभियंत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र सदनातील कामांमध्ये होत असलेली अनावश्यक दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कामांबाबत हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत तंबी दिली.



महाराष्ट्रातून दिल्ली येथे विविध शासकीय कामांसाठी, उपचारांसाठी तसेच इतर कारणांनी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. अशा नागरिकांना महाराष्ट्र सदनात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन प्राधान्याने काम करत असल्याचे मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सदन हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथील सुविधा, स्वच्छता, देखभाल आणि आधुनिक सोयीसुविधा उच्च दर्जाच्या असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच बरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेले निवासाचे काम देखील जलद गतीने पूर्ण कणायसाठी सूचना दिल्या.



बैठकीदरम्यान नवीन महाराष्ट्र सदन व जुने महाराष्ट्र सदन येथे सुरू असलेल्या दुरुस्ती, सुशोभीकरण, कर्मचारी निवास व्यवस्था सुधारणा, विद्युत व्यवस्था, पायाभूत सुविधा उन्नतीकरण, अंतर्गत देखभाल तसेच विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक कामे मंजूर होऊनही अद्याप पूर्णत्वास न गेल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे प्रत्यक्ष पाहणी करून कामांमध्ये गती आणावी तसेच कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.



कामांच्या प्रगतीबाबत समाधानकारक स्थिती दिसून न आल्याने काही संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री भोसले यांनी बैठकीतच कडक शब्दांत तंबी दिली. नागरिकांच्या सुविधांशी संबंधित कामांमध्ये विलंब होणे गंभीर बाब असून, यापुढे कामकाजात दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.



यावेळी महाराष्ट्र सदनातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या विविध कामांची सद्यस्थिती, कामांची गती आणि गुणवत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये तसेच नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


शासन निर्णयानुसार नवीन महाराष्ट्र सदनाच्या मागील बाजूचे नुतनीकरण, नवीन व जुन्या महाराष्ट्र सदनातील विद्युत उपकरणांचे अद्यावतीकरण तसेच आधुनिक आयपी आधारित सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये नुतनीकरण, विद्युतीकरण, फर्निचर, एचव्हीएसी दुरुस्ती, एलईडी प्रकाशयोजना सुधारणा, विद्युत वायरिंग बदल, तसेच नवीन सीसीटीव्ही यंत्रणा स्थापनेचा समावेश आहे.


कामे हाती घेताना अर्थसंकल्पीय तरतूद, तांत्रिक मान्यता, पर्यावरण विषयक नियम, ‘ना हरकत’ प्रमाणपत्रे, ई-निविदा प्रक्रिया तसेच GeM पोर्टलच्या कार्यपद्धतीचे पालन करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. कामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देत वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.


कामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि प्रशासनातील समन्वय याबाबत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देत मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येईल तसेच प्रलंबित कामांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.


यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच महाराष्ट्र सदन प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय