Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि. (१७.८५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६१ दिवस म्हणजेच किमान दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने आणि अल निनो वादळाचा प्रभाव, त्याचा पावसावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतून दररोज ४,२०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे, भिवंडी महापालिकेचा २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा समाविष्ट आहे. आगामी काळात मुंबईसह राज्यात अल निनो वादळाचा प्रभाव असेल. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे. त्यासाठीच मुंबई महापालिकेने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.पालिकेने राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी अगोदरच केली होती. त्याला सरकारकडूनदेखील मंजुरी मिळाल्याचे समजते. त्यामुळे यदाकदाचित सात तलावांतील पाणीसाठा संपुष्टात आल्यास राखीव कोट्यातून पाणीपुरवठा करण्याची तजवीज महापालिकेने अगोदरच करून ठेवली आहे. मात्र वेळेत पाऊस न पडल्यास आणि संपूर्ण जून महिना पावसाविना गेल्यास मुंबईला आणखीन मोठ्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.


">पर्यायी स्रोत निर्माण होईपर्यंत संकट कायम

लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, दररोज होणारा अपुरा पालिकेने मुंबई शहराची वाढती पाणीपुरवठा पाहता पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी एकीकडे सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे पालिकेने गारगाई हे नवीन धरण बांधण्याचे कामदेखील हाती घेतले आहे. नवे पाणी प्रकल्प निर्माण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Tags
Mumbai Water SupplyBMC Water CutMumbai Lakes Water LevelEl Nino Impact MaharashtraWater Scarcity Mumbai
Comments
Add Comment

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के