Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र, येथील 'रेशम धाब्यावर' (Resham Dhaba) ग्राहकांना एका वेगळ्याच तंत्रज्ञानाची अनुभूती मिळत आहे. या धाब्यावर चक्क एका 'रोबोट वेटर'ची (Robot Waiter) नियुक्ती करण्यात आली असून, त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्याकडून सेवा घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.



स्वतःहून टेबलपर्यंत पोहोचवतो जेवण


हा रोबोट नेव्हिगेशन सिस्टीमच्या (Navigation System) साहाय्याने ठरवून दिलेल्या मार्गावरून प्रवास करतो आणि ग्राहकांच्या टेबलपर्यंत स्वयंपाकघरातून तयार झालेले अन्न सुरक्षितपणे पोहोचवतो. किचनमध्ये ऑर्डर तयार झाली की, अन्नाचा ट्रे या रोबोटवर ठेवला जातो आणि तो सहजतेने दिलेल्या टेबल नंबरवर पोहोचतो.



आकर्षक रूप आणि तंत्रज्ञानाची साथ




हा रोबोट चालवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आणि रिमोर्ट कंट्रोल सिस्टीमचा वापर केला जातो. फायबरपासून बनवलेली त्याची मजबूत बॉडी आणि डोळ्यांमधील एलईडी (LED) लाईट्स त्याला अत्यंत आकर्षक बनवतात. त्याचा लाल रंगाचा प्रकाश आणि फ्युचरिस्टिक (Futuristic) लूक उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा रोबोट सुमारे दीड ते दोन तास सलग काम करू शकतो. या रोबोटच्या सेवेसाठी धाब्याकडून ग्राहकांकडून कोणताही अतिरिक्त चार्ज घेतला जात नाही.



बंगळुरूच्या टीमकडून निर्मिती; मुलांमध्ये विशेष आकर्षण


रेशम धाब्याचे व्यवस्थापक (मॅनेजर) संजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रोबोट बंगळुरू येथील एका तज्ज्ञ टीमच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. मुरथलमध्ये येणाऱ्या खवय्यांना केवळ चांगल्या अन्नाची चवच नाही, तर एका आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा अनुभव मिळावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या रोबोटवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार रिमोटने नियंत्रित करण्यासाठी एका स्वतंत्र टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. धाब्यावर येणारी लहान मुले या रोबोटला पाहून खूप आनंदित होत असून, त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल काढून गर्दी करत आहेत.



अहमदाबादमध्येही झाला होता असाच प्रयोग


हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोबोटचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी अहमदाबादमधील एका कॅफेमध्ये असाच प्रयोग करण्यात आला होता. तिथे 'आयशा' (Aisha) नावाचा रोबोट ग्राहकांना आईस गोला (Gola) सर्व्ह करत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्या रोबोटची किंमत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये होती. आता मुरथलच्या रेशम धाब्यावरील हा रोबोट वेटरही सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय

Ujjain Mahakal Stampede : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; नागचंद्रेश्वर दर्शनादरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती, १३ जण जखमी

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैन (Ujjain) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Malakaleshwar Temple) महादेवाच्या

Laxmi Mittal Ukraine Steel Plant : लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा मिसाईल हल्ला; २ जणांचा मृत्यू, १४ कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून, रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एकावर