Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल



मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारपर्यंतच आहे. यामुळे या घरांसाठी अर्ज करण्यासाठी ही अखेरची संधी आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत २६४० घरांसाठी ८७ हजार २३९ जणांनी अर्ज भरले आहेत. मात्र यातील केवळ ६१ हजार १५३ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. अनामत रक्कमेसह सादर होणारे अर्जच सोडतीत सहभागी होतात. त्यामुळे २९ मे रोजी शेवटच्या क्षणापर्यंत किती अर्ज सादर होतात याकडे अर्जदारांसह म्हाडाचे लक्ष लागले आहे.
विक्रोळीतील कन्नमवार नगर, बोरिवली, गोरेगाव, मालाड, मालवणी, जुहू, अंधेरी, वांद्रे, दादर, ताडदेव यासह अन्य काही ठिकाणच्या २६४० घरांसाठी मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. वेळापत्रकानुसार १५ मे रोजी सोडत काढली जाणार होती. मात्र सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. परिणामी १५ मेची सोडत ५ जूनवर गेली. पहिल्या मुदतवाढीनुसार १५ मे रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुष्टात येणार म्हटताच दोन दिवस आधी मंडळाने पुन्हा, दुसऱ्यांदा अर्जविक्री-स्वीकृतीस २९ मेपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे ५ जूनची सोडतही पुढे गेली. अद्याप सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र जूनमध्येच सोडत काढली जाणार आहे. तर दुसऱ्या मुदतवाढीनुसार आता अर्ज भरण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. गुरुवारी रात्री ११.५९ वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीने अर्ज भरणे आणि अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.




मुंबई मंडळातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीतील बांधकाम चालू असलेल्या सदनिका या गटामध्ये कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १२२१ सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली आहे. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका सोडतीत संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ या नवीन संकेत क्रमांकान्वये केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बदलामुळे उच्च उत्पन्न गटातील अधिकाधिक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले घर मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पातील सोडतीत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक वाहनतळ विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील मंडळाने जाहीर केला आहे त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील इच्छुक अर्जदारांसाठी हा प्रकल्प अधिक आकर्षक ठरत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार