Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. हा कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया करण्याचा मोठा आर्थिक भार महानगरपालिका आणि करदात्यांवर पडत असल्याचे पर्यावरण संशोधन संस्था सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) अहवालातून समोर आले आहे.



‘धोरण, व्यवहार आणि प्लास्टिक : भारतीय शहरांमधील प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा खर्च’ या अहवालानुसार, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी होणाऱ्या एकूण खर्चाच्या तुलनेत उत्पादक कंपन्यांचा वाटा अत्यल्प आहे. त्यामुळे उर्वरित खर्च सार्वजनिक निधीतून भागवावा लागत आहे.



डोंगराळ आणि दुर्गम भागांत ही समस्या अधिक गंभीर आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा खर्च सुमारे नऊ रुपये प्रतिकिलो आहे. मात्र, कंपन्यांकडून त्यासाठी केवळ एक रुपया प्रतिकिलो मिळतो. पोर्ट ब्लेअरमध्ये हा खर्च १० ते १२ रुपये, तर इंदूरसारख्या सपाट शहरात दोन ते चार रुपये प्रतिकिलो आहे.



‘कचरा करणाऱ्यानेच खर्च द्यावा’ : पर्यावरण संरक्षण कायद्यातील विस्तारित उत्पादक जबाबदारीच्या (ईपीआर) तत्त्वानुसार, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची आर्थिक जबाबदारी उत्पादकांची असणे अपेक्षित आहे. मात्र, कंपन्यांकडून अपुरा निधी मिळत असल्याने उर्वरित भार महानगरपालिकांना करांच्या माध्यमातून उचलावा लागत आहे. दुसरीकडे, कचरा संकलनाचे काम करणाऱ्या असंघटित सफाई कामगारांनाही योग्य मोबदला मिळत नसल्याचे अहवालात नमूद आहे.



सीएसईने डोंगराळ आणि बेटांवरील शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा खर्च अधिक असल्याने अशा भागांसाठी कंपन्यांकडून अधिक शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, दिल्ली सरकारकडून १७ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘दिल्ली कचरामुक्त–स्वच्छता मोहीम २०२६’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राजधानीतील स्वच्छता व्यवस्था सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
Comments
Add Comment

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात

Shahzad Bhatti Network : केंद्र सरकारची मोठी कारवाई : ISI समर्थित ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा पर्दाफाश; १४ राज्यांतून २५३ जण ताब्यात

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केल्याचा दावा केंद्र

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय

Ujjain Mahakal Stampede : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; नागचंद्रेश्वर दर्शनादरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती, १३ जण जखमी

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैन (Ujjain) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Malakaleshwar Temple) महादेवाच्या