MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरी २०२६ ला प्रचंड प्रतिसाद! मुंबईतील २,६४० घरांसाठी ८२ हजारांहून अधिक अर्ज; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जाणून घ्या!

मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी म्हाडाची (MHADA Lottery 2026) घरांची सोडत मोठी संधी ठरत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या सोडतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल ८२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज प्रक्रियेसाठी अवघे ३ दिवस शिल्लक असल्याने अंतिम मुदतीपर्यंत अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय (Middle Class) कुटुंबांसाठी घर खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत म्हाडाकडून (Mhada) परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिलेल्या घरांकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे. विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वडाळा, घाटकोपर, पवई, दादर, वांद्रे आणि गोराई यांसारख्या प्रमुख भागांमध्ये घरे उपलब्ध असल्याने अर्जदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.



२८ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी


म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इच्छुक अर्जदारांना २८ मे २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ मे निश्चित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांकडून मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन म्हाडाने अर्जाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्या ही मुदत पुन्हा वाढवली जाणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents) कोणती?


म्हाडा घरांच्या सोडतीसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक (Mobile Number), ई-मेल आयडी (E-Mail Id), आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड (Pan Card), अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) आणि आयकर विवरणपत्र (ITR) यांचा समावेश आहे.



विवाहित अर्जदारांसाठी पती किंवा पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातील अर्जदारांना जात प्रमाणपत्र व संबंधित प्रवर्गाची कागदपत्रे जोडावी लागतील. विधवा अर्जदारांना मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.


ईएमडी भरण्यासाठी २९ मेपर्यंत मुदत


ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मे असली तरी अर्जासोबतची अनामत रक्कम (Earnest Money Deposit - EMD) भरण्यासाठी अर्जदारांना २९ मे २०२६ रोजी रात्री ११:५९ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्जदारांनी संबंधित बँकेच्या कामकाजाच्या वेळेत RTGS किंवा NEFT च्या माध्यमातून ही रक्कम जमा करणे आवश्यक आहे.


पात्र अर्जदारांची यादी कधी जाहीर होणार?


म्हाडाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पात्र अर्जदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारांना १२ जूनपर्यंत हरकती आणि दावे नोंदवण्याची संधी दिली जाईल. सर्व हरकतींची पडताळणी झाल्यानंतर १६ जून रोजी अंतिम पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर संगणकीकृत सोडतीची तारीख आणि वेळ घोषित करण्यात येईल.



काही घरांच्या किंमतीत मोठी कपात


म्हाडाने या सोडतीतील काही घरांच्या किंमतीत कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे. विक्रोळी येथील १,२२१ घरांच्या किंमतीत सुमारे ७.५ टक्के घट करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पातील ६१० घरांची श्रेणी मध्यम उत्पन्न गट (MIG) मधून उच्च उत्पन्न गट (HIG) मध्ये वर्ग करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक इच्छुक अर्जदारांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


६६ टक्के घरे अद्याप बांधकामाधीन (Under Construction) 


म्हाडाच्या या सोडतीतील एकूण २,६४० घरांपैकी तब्बल १,७६२ घरे अद्याप बांधकामाधीन (Under Construction) आहेत. ही घरे प्रामुख्याने विक्रोळी, गोरेगाव आणि बोरीवली परिसरात स्थित आहेत. यामध्ये बोरीवली पूर्व येथील १२८ घरे, गोरेगाव पश्चिम येथील ८५ घरे आणि उर्वरित मोठा हिस्सा विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरातील घरांचा आहे.



म्हाडाच्या घरांच्या किंमती किती?


या सोडतीतील सर्वात महागडे घर दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात असून त्याची किंमत सुमारे ६.८२ कोटी रुपये आहे. दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) मानखुर्द येथे उपलब्ध घरांची सुरुवातीची किंमत सुमारे २९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच गोरेगावमधील सुमारे ३०० चौरस फुटांच्या घराची किंमत अंदाजे ३२ लाख रुपये आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणाऱ्या घरांचे पर्याय अत्यंत मर्यादित असताना, म्हाडाची ही सोडत सर्वसामान्य नागरिकांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी मानली जात आहे.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या