Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) भरारी पथकांकडून तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान चालकाला मराठी भाषेचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान नसल्याचे आढळल्यास त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. भाषा शिकण्यासाठी आणि कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी चालकाला एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे.  (Taxi drivers)


सुधारित महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर तीन टप्प्यांत कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरटीओची भरारी पथके अचानक तपासणी करून चालकांचे मराठी भाषेतील व्यावहारिक ज्ञान तपासतील. आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाला नोटीस बजावून मूलभूत मराठी शिकण्यासाठी मुदत दिली जाईल.



नाहीतर चालकांना निलंबित केले जाईल


या मुदतीत चालकाने आवश्यक भाषिक कौशल्य आत्मसात केले नाही आणि नोटिशीचे पालन केले नाही, तर दुसऱ्या टप्प्यात त्याचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील नोटीस बजावून सुधारित नियमांनुसार चालकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. (Auto Rikshaw)


दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत राज्यातील 58 आरटीओ कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेला मूलभूत मराठी भाषा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. परिवहन विभागाने एक लाखांहून अधिक प्रमाणपत्रे तयार केली आहेत. ही प्रमाणपत्रे चालकांकडे ठेवण्यात येणार असून, तपासणीदरम्यान ती सादर करता येतील.


चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट रोजी संपली आहे. सार्वजनिक वाहतूक चालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ व्हावा, तसेच प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, हा या नियमामागील उद्देश असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.  (Marathi Language)


 
Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान