French Open 2026 Novak Djokovic : नोव्हाक जोकोविच दमदार सुरुवात; २५व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने विजयी पाऊल

नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याने फ्रेंच ओपन २०२६ स्पर्धेत विजयी सलामी देत आपल्या विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मोहिमेला शानदार सुरुवात केली. पॅरिसमधील रोलाँ गॅरोस कोर्टवर झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात जोकोविचने फ्रान्सच्या जिओव्हानी म्पेत्शी पेरिकार्ड (Giovanni Mpetshi Perricard) याचा ५-७, ७-५, ६-१, ६-४ अशा सेट्समध्ये पराभव केला. (French Open 2026 Novak Djokovic)



सामन्याच्या सुरुवातीला मात्र सर्बियन स्टारला कडवी झुंज द्यावी लागली. घरच्या प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्यावर खेळणाऱ्या जिओव्हानीने पहिल्याच सेटमध्ये आक्रमक खेळ करत जोकोविचला दबावाखाली ठेवले. विशेषतः त्याच्या वेगवान आणि अचूक सर्व्हिसमुळे जोकोविच अनेकदा अडचणीत सापडला. ६-५ अशी आघाडी घेतल्यानंतर जिओव्हानीने जोरदार ‘एस’ मारत पहिला सेट आपल्या नावावर केला आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. (French Open 2026 Novak Djokovic)


विशेष म्हणजे, गेल्या १७ वर्षांत फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत जोकोविचविरुद्ध सेट जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्यामुळे सुरुवातीला या सामन्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. (French Open 2026 Novak Djokovic)


मात्र अनुभवी जोकोविचने दुसऱ्या सेटपासून आपला खरा खेळ दाखवायला सुरुवात केली. संयम, अचूक फटके आणि अनुभवाच्या जोरावर त्याने सामना हळूहळू आपल्या नियंत्रणात आणला. दुसरा सेट ७-५ ने जिंकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि तिसऱ्या सेटमध्ये त्याने अक्षरशः वर्चस्व गाजवत ६-१ अशी एकतर्फी बाजी मारली. (French Open 2026 Novak Djokovic)



चौथ्या सेटमध्ये जिओव्हानी म्पेत्शी-पेरिकार्डला मनगट आणि हाताच्या त्रासामुळे वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. दुखापतीनंतरही त्याने संघर्ष कायम ठेवला, मात्र जोकोविचच्या अनुभवासमोर त्याचा निभाव लागला नाही. निर्णायक क्षणी ब्रेक मिळवत जोकोविचने सामना जिंकला आणि सलग २२व्यांदा फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत विजय मिळवण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. (French Open 2026 Novak Djokovic)


या विजयासह जोकोविचने आणखी एका ऐतिहासिक टप्प्याला गवसणी घातली. त्याने Roger Federer याचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी सामने जिंकणारा खेळाडू बनण्याचा मान पटकावला. (French Open 2026 Novak Djokovic)



सामन्यानंतर बोलताना जोकोविचने प्रतिस्पर्ध्याचे कौतुक केले. तो म्हणाला, “जिओव्हानीविरुद्ध मी पहिल्यांदाच खेळत होतो. त्याची सर्व्हिस ओळखणे खूप कठीण होते. माझ्या कारकिर्दीत फार कमी खेळाडूंमध्ये अशी ताकद आणि वेग पाहायला मिळाला आहे.” (French Open 2026 Novak Djokovic)


त्याचबरोबर रोलाँ गॅरोसमधील वातावरणाबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला. “इथले वातावरण अप्रतिम होते. प्रेक्षकांकडून मिळालेली ऊर्जा माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली,” असेही जोकोविचने सांगितले. (French Open 2026 Novak Djokovic)


आता सर्वांचे लक्ष जोकोविचच्या पुढील फेरीतील कामगिरीकडे लागले असून, तो यंदा इतिहास रचत २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार का, याची उत्सुकता टेनिस चाहत्यांमध्ये वाढली आहे. (French Open 2026 Novak Djokovic)

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील