Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर शुक्रवारी मौन सोडले. या प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. (Sourav Ganguly)


कोलकाता येथील 'ॲक्रोपॉलिस मॉल'मध्ये एका दुकानाच्या उद्घाटनादरम्यान पत्रकारांशी बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला, "आम्ही याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो सोक्षमोक्ष लावतील याची मला खात्री आहे. धमकी आलेला फोन नंबर हा कोलकातामधीलच आहे. आशा आहे की पोलीस योग्य ती कारवाई करतील. माझ्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे." (Sourav Ganguly)



कोलकात्यातील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गांगुली आणि त्याच्या कुटुंबाला गेल्या सहा महिन्यांपासून धमकीची पत्रे येत होती. या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या दोन पत्रांमध्ये "संपवून टाकू" अशा अत्यंत गंभीर शब्दांचा वापर करण्यात आल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले. सुरवातीला गांगुली कुटुंबाने या पत्रांकडे काही अतिउत्साही चाहत्यांचे कृत्य म्हणून दुर्लक्ष केले होते. मात्र, धमक्यांचे सत्र सुरूच राहिल्याने आणि पत्रांतील भाषा अधिक आक्रमक झाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. (Sourav Ganguly)

Comments
Add Comment

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने