INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील पहिला सामना शनिवार १५ ते बुधवार १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत खेळवला जाईल. हा पाच दिवसांचा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजता खेळ सुरू होणार आहे. याआधी सकाळी साडेनऊ वाजता नाणेफेक होणार आहे.



गॉलच्या खेळपट्टीवर खेळवला जात असलेला हा ५० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. आशिया खंडात सर्वाधिक कसोटी सामने याच मैदानावर खेळवले गेले आहेत. यामुळे गॉलच्या खेळपट्टीवर होणार असलेला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून होण्याची शक्यता आहे.



सध्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून संघ बांधणीसाठी प्रयोग सुरू आहेत. यामुळे भारतीय संघ स्थित्यंतरातून जात आहे. भारताचे युवा खेळाडू फिरकी गोलंदाजीसमोर चाचपडत आहेत. गॉलची खेळपट्टी तर फिरकीपटूंना अतिरिक्त उसळी देते. फलंदाजांना संयमाने खेळावे लागते. यामुळे पहिल्या कसोटीतील भारताच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असेल.



कसोटी मालिका कुठे बघता येणार ?


सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर तसेच SonyLIV अॅपवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बघता येईल. डी स्पोर्ट्स आणि डीडी फ्री डिशवर पण सामने बघता येतील.



हवामान


गॉल कसोटी सामन्यात धूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय, खेळादरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहील. किनारपट्टीजवळच मैदान असल्यामुळे जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या वातावरणाचा फायदा फिरकीपटूंना होईल. यामुळे पहिले दोन दिवस फलंदाजांनी संयम राखून व्यवस्थित अंदाज घेतला तर ते जस्त धावा काढू शकतील. नाहीतर भराभर विकेट जाण्याचा धोका आहे.



गॉलचे ऐतिहासिक महत्त्व


गॉलवर ५० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना रंगणार आहे. आशिया खंडात सर्वाधिक कसोटी सामने गॉलवर खेळवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गॉलवर कसोटी सामन्याचा निकाल लागण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आतापर्यंत झालेल्या ४९ कसोटी सामन्यांपैकी फक्त १४.२८ टक्के सामनेच अनिर्णित राहिले आहेत. यामुळे गॉल कसोटी निकाली ठरेल, असे अनेकांना वाटत आहे.


विक्रमांची संधी




  • रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळी पूर्ण करण्यापासून फक्त दोन बळी दूर आहे.

  • भारताने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या १० कसोटी सामन्यांपैकी आठ जिंकले आहेत आणि दोन अनिर्णित राहिले आहेत. पण श्रीलंकेने गॉल येथे भारताविरुद्धचा आपला शेवटचा कसोटी सामना २०१५ मध्ये जिंकला होता. यामुळे आता कोण जिंकणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.


भारत : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा, आकिब नबी, ध्रुव जुरेल, गुरनूर जैन आणि गुरनूर ब्रार.


श्रीलंका : निशान मदुशंका, लाहिरू उदारा, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पासिंदू सुरियाबंदरा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशान, विष्णु मदुशान, विष्णु कुमारी, प्रभात जयसूर्या. मिलन प्रियनाथ रत्नायके आणि केशरा नुवंता.


Comments
Add Comment

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात