Sunday, May 24, 2026

Raja Shivaji Movie : राजा शिवाजी कोणत्या OTT वर आणि कधी प्रदर्शित होणार ?

Raja Shivaji Movie : राजा शिवाजी कोणत्या OTT वर आणि कधी प्रदर्शित होणार ?
अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि इतिहासाचा पट मांडणाऱ्या या भव्य चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केले आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने १०० कोटींच्या उंबरठ्यावर धडक मारली आहे. चित्रपटगृहातील या तुफान यशानंतर आता हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, याकडे जगभरातील शिवाजी महाराजप्रेमी आणि रिेशच्या चाहत्यांचे लक्ष आहे. ओटीटी प्रदर्शनाबाबतची उत्सुकता आणि संभाव्य प्लॅटफॉर्म ‘राजा शिवाजी’ या मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा होत आहेत . सर्वसाधारणपणे, बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणारे चित्रपट चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतर साधारण ४५ ते ६० दिवसांनी ओटीटीवर दाखल होतात. हाच पायंडा लक्षात घेता, ‘राजा शिवाजी’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांकडून अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी, हा महाचित्रपट थेट ‘जिओ हॉटस्टार’ (JioHotstar) किंवा 'झी फाईव्ह' (Zee 5) या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पॅन इंडिया स्तरावर सहा भाषांमध्ये होणार प्रदर्शित चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला असला, तरी ओटीटीवर मात्र हा चित्रपट ‘पॅन इंडिया’ (Pan India) स्तरावर प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट मराठी आणि हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण सहा भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. यामुळे शिवरायांचा गौरवशाली इतिहास केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
डिजिटल हक्कांसाठी कोट्यवधींचा करार ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या डिजिटल हक्कांचा (Digital Rights) व्यवहार चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अत्यंत मोठ्या रकमेत झाला होता. या चित्रपटाचे ओटीटी हक्क तब्बल ९० कोटी रुपयांहून अधिक किमतीत विकले गेल्याची चर्चा आहे, जो मराठी सिनेसृष्टीतील एक ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे. रितेश देशमुख यांनी गेली दहा वर्षे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर कठोर परिश्रम घेतले असून, त्या कष्टाचे फळ आता मोठ्या आर्थिक यशाच्या रूपात मिळत असल्याचे दिसत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा