IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

- सुशील परब


कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना आज संध्याकाळी ७.३० वाजता ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान कोलकाताची फलंदाजी धुरा कर्णधार अजिंक्य रहाणे, फिन ऍलन, रिंकू सिंग, कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे आणि रोवमन पॉवेल यांच्यावर अवलंबून असेल, तर गोलंदाजीत सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.



दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले असले तरी ते कोलकात्याचे गणित बिघडवण्याची पूर्ण क्षमता ठेवतात. दिल्लीसाठी के. एल. राहुल कमालीच्या फॉर्ममध्ये असून त्याने या हंगामात चार अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. मात्र, इतर फलंदाज सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याने संघ अडचणीत आला आहे. मात्र आज डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, समीर रिझवी आणि साहिल पारेख यांना या सामन्यात जबाबदारीने खेळावे लागेल, तर गोलंदाजीत मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांच्यावर संघाची मदार असेल. या हंगामात अक्षर पटेल यांना अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे केकेआरचे प्लेऑफचे स्वप्न चक्काचूर करण्यात दिल्ली यशस्वी होईल का हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Comments
Add Comment

2032 UCI Road World Championships : पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ स्पर्धा; आयोजनाला शासनाचे पाठबळ

पुणे : ग्रँड टूर – २०२६ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद

IND vs SL Galle Test : गॉल कसोटी जिंकण्यासाठी भारताला सहा बळींची आवश्यकता

गॉल : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने

FIFA Leadership Crisis : फिफाची मोठी कारवाई, सीओओ केविन लार्मर यांना हटवले

नवी दिल्ली : फिफा, या जागतिक नियामक संस्थेने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), केविन लार्मर यांच्याशी संबंध

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास