Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास रचला आहे. पंतने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचवेळी कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. एवढ्यावरच पंत थांबलेला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत १०० षटकार पूर्ण करण्याचा विश्वविक्रमही आता त्याच्या नावावर झाला आहे. (Rishabh Pant New Record)



पंतच्या नावावर १०० षटकार :


श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी पंतच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ९७ षटकार होते. गॉल कसोटीच्या पहिल्या डावात त्याने आणखी एक षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या डावात षटकारासह अर्धशतक पूर्ण करत त्याने १०० षटकारांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. पंतने दुसऱ्या डावात ६९ चेंडूंत ६६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्यातील एका षटकाराने त्याला या खास विक्रमाच्या क्लबमध्ये स्थान मिळवून दिले. (Rishabh Pant New Record)



भारताकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज :


कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा पंत हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला हा टप्पा गाठता आलेला नव्हता. पंतच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये बेन स्टोक्स, ब्रेंडन मॅक्युलम आणि ॲडम गिलख्रिस्ट यांचा समावेश होता. (Rishabh Pant New Record)



८९ डावांत षटकारांचं शतक!


पंतने हा पराक्रम केवळ १०० षटकार पूर्ण करून केला नाही, तर तो सर्वात कमी डावांत करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. रिषभ पंतने अवघ्या 89व्या डावात कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. गिलख्रिस्टने १३० डावांत हा टप्पा गाठला होता. (Rishabh Pant New Record)



फलंदाज आणि १०० षटकार पूर्ण करण्यासाठी लागलेले डाव :


- रिषभ पंत : ८९ डाव
- ॲडम गिलख्रिस्ट : १३० डाव
- बेन स्टोक्स : १५१ डाव
- ब्रेंडन मॅक्युलम : १७० डाव


यावरून पंतची कसोटी क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजी किती प्रभावी आहे, याचा अंदाज येतो. (Rishabh Pant New Record)



आक्रमक फलंदाजीची पंतची ओळख कायम :


रिषभ पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने कसोटी क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. कठीण परिस्थितीतही मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता ही भारतीय संघासाठी मोठी ताकद मानली जाते. आता १०० कसोटी षटकारांचा टप्पा गाठत पंतने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवे पान जोडले आहे. त्यासोबतच सर्वात जलद १०० षटकार पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर करत त्याने पुन्हा एकदा आपली आक्रमक शैली सिद्ध केली आहे. (Rishabh Pant New Record)

Comments
Add Comment

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील