Raja Shivaji Movie : राजा शिवाजी कोणत्या OTT वर आणि कधी प्रदर्शित होणार ?

अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि इतिहासाचा पट मांडणाऱ्या या भव्य चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केले आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने १०० कोटींच्या उंबरठ्यावर धडक मारली आहे. चित्रपटगृहातील या तुफान यशानंतर आता हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, याकडे जगभरातील शिवाजी महाराजप्रेमी आणि रिेशच्या चाहत्यांचे लक्ष आहे.

ओटीटी प्रदर्शनाबाबतची उत्सुकता आणि संभाव्य प्लॅटफॉर्म

राजा शिवाजी’ या मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चा होत आहेत . सर्वसाधारणपणे, बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणारे चित्रपट चित्रपटगृहातील प्रदर्शनानंतर साधारण ४५ ते ६० दिवसांनी ओटीटीवर दाखल होतात. हाच पायंडा लक्षात घेता, ‘राजा शिवाजी’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांकडून अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी, हा महाचित्रपट थेट ‘जिओ हॉटस्टार’ (JioHotstar) किंवा 'झी फाईव्ह' (Zee 5) या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



पॅन इंडिया स्तरावर सहा भाषांमध्ये होणार प्रदर्शित

चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला असला, तरी ओटीटीवर मात्र हा चित्रपट ‘पॅन इंडिया’ (Pan India) स्तरावर प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट मराठी आणि हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण सहा भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. यामुळे शिवरायांचा गौरवशाली इतिहास केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.



डिजिटल हक्कांसाठी कोट्यवधींचा करार

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या डिजिटल हक्कांचा (Digital Rights) व्यवहार चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अत्यंत मोठ्या रकमेत झाला होता. या चित्रपटाचे ओटीटी हक्क तब्बल ९० कोटी रुपयांहून अधिक किमतीत विकले गेल्याची चर्चा आहे, जो मराठी सिनेसृष्टीतील एक ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे. रितेश देशमुख यांनी गेली दहा वर्षे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर कठोर परिश्रम घेतले असून, त्या कष्टाचे फळ आता मोठ्या आर्थिक यशाच्या रूपात मिळत असल्याचे दिसत आहे.
Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के