National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींच्या आधारे, विविध श्रेणींमध्ये खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगली कामगिरी, नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि शिस्त या आधारे अर्जुन पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांमध्ये महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिचा समावेश आहे. सरकारने दिव्यासह एकूण १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर केला आहे.



अ‍ॅथलेटिक्समध्ये तेजस्विन शंकर, मुहम्मद अजमल वी, प्रियंका गोस्वामी तर बॅडमिंटनमध्ये त्रिशा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुष्टियुद्धात नरेंद्र, बुद्धिबळमध्ये विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख, नेमबाजीत (कर्णबधीर व्यक्तींसाठी) धनुष श्रीकांतला अर्जुन पुरस्कार मिळणार आहे. हॉकीत लालरेमसियामी आणि राजकुमार पाल तर कबड्डीत सुरजीत आणि पूजाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरा -नेमबाजीत रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये एकता भायन, नौकानयनमध्ये अरविंद सिंह आणि नेमबाजीत अखिल शेरॉनला अर्जुन पुरस्कार मिळणार आहे.



क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या आणि सक्रिय क्रीडा कारकिर्दीतून निवृत्तीनंतरही खेळाच्या प्रसारासाठी योगदान सुरूच ठेवणाऱ्या क्रीडापटूंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्जुन पुरस्कार जीवनगौरव प्रदान करतात. यावेळी फुटबॉलमध्ये आय अरुमइनायागम यांना अर्जुन पुरस्कार जीवनगौरव जाहीर झाला आहे.



अ‍ॅथलेटिक्समध्ये परवीर सिंह, मुष्टियुद्धात छोटे लाल यादव आणि नेमबाजीत नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच मुष्टियुद्धात धर्मेंद्र सिंह यादव आणि कुस्तीत वीरेन्दर कुमार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 'आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे' या संस्थेला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.