Weather Update IMD Alert : पुढील १५ तास धोक्याचे! १७ राज्यांमध्ये वादळी पाऊस, तर उत्तर भारतात उष्णतेचा कहर

उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १७ राज्यांसाठी मोठा हवामान इशारा जारी केला आहे. पुढील १५ ते १६ तासांत पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, वाऱ्याचा वेग ताशी ८० ते १०० किमीपर्यंत पोहोचू शकतो. तर मात्र दुसरीकडे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप कायम राहणार आहे. (Weather Update IMD Alert)



दिल्लीत ४७°C पर्यंत तापमानाची शक्यता :


२१ ते २६ मे दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर गरम वारे वाहतील आणि तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Weather Update IMD Alert)



उत्तर प्रदेशात उष्णतेचा कहर :


उत्तर प्रदेशात उष्णतेने अक्षरशः नागरिक हैराण झाले आहेत. बांदा येथे तापमान ४८.२°C वर पोहोचले असून, लखनौ, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराजमध्ये पुढील काही दिवस तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update IMD Alert)



बिहारमध्ये पावसाचा अलर्ट :


बिहारमध्ये पुढील १२ तासांत हवामान बदलण्याची शक्यता आहे. पाटणा, भागलपूर आणि मुझफ्फरपूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहू शकतात.





राजस्थानमध्ये रेड अलर्ट :


राजस्थानमध्ये २६ मेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असून, जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूरमध्ये तापमान ४८°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे. (Weather Update IMD Alert)



हिमाचल आणि झारखंडमध्ये वादळी पावसाचा अंदाज :


हिमाचल प्रदेशात २१ ते २३ मे दरम्यान पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर झारखंडमध्ये रांची, जमशेदपूर आणि धनबाद येथे वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



पंजाबमध्ये उष्णतेसोबत धुळीची वादळे :


पंजाबमध्ये चंदीगडसह अनेक भागांमध्ये तापमान ४५°C च्या आसपास पोहोचले आहे. अमृतसर, लुधियाना आणि पतियाळा येथे धुळीची वादळे आणि उष्णतेची लाट कायम राहणार आहे.



मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा :


अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये हवामान खराब राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Weather Update IMD Alert)

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत