Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन रविवारी १६ व्या दिवशीही सुरूच राहिले. सरकारसोबत झालेल्या सविस्तर चर्चेत सरकारने ९८ टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशीची मागणी आणि सीजीएल परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होऊ शकले नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन आणि 'विधानसभा घेराव'चा निर्णय कायम ठेवला आहे. ( Jharkhand Exam Scam)


झारखंड सरकारच्या वतीने मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी सांगितले की, तीन दिवस चाललेल्या बैठका आणि चर्चेनंतर सरकारने विद्यार्थ्यांच्या ९८ टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. यात १४ वी जेपीएससी परीक्षा आणि २०२३-२५ च्या बॅकलग परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच लखनौच्या टीडीपीएल एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांच्या चौकशीचे संकेतही सरकारने दिले आहेत.





सरकारने गुन्हेगारी स्वरूपाच्या तपासासाठी सीआयडी आणि आर्थिक गैरव्यवहारांसाठी ईडी चौकशीचा प्रस्ताव दिला असून, उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन करण्याची तयारीही दर्शवली आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत केवळ सीबीआय चौकशीच हवी असल्याचे स्पष्ट केले असून, ते आपल्या मागणीवर अडून आहेत. सीजीएल परीक्षा रद्द करण्यास सरकारचा नकार: सीजीएल परीक्षा उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या देखरेखीखाली पार पडली असून त्याचे निकाल जाहीर होऊन यशस्वी उमेदवार आधीच नोकरीत रुजू झाले आहेत, त्यामुळे ही परीक्षा एकात्मिकरीत्या रद्द करणे शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. ( Exam Controversy)


सरकारने बहुतांश मागण्या पूर्ण केल्याचे सांगितले असले, तरी विद्यार्थी नेते कुणाल आणि रवींद्र पासवान यांनी आमची सीबीआय चौकशीची मुख्य मागणी कायम असून जोपर्यंत ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच नियोजित 'विधानसभा घेराव' शांततापूर्ण मार्गाने पार पडेल, असेही त्यांनी जाहीर केले. सध्या या आंदोलनादरम्यान सहा विद्यार्थी आमरण उपोषणावर आहेत. दुसरीकडे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनाचे राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. "चर्चा हाच प्रत्येक समस्येवरचा उपाय आहे, बळाचा वापर नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पूर्ण पारदर्शकतेने न्याय दिला जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावर सरकार आणि विद्यार्थ्यांमधील हा तिढा अद्याप कायम आहे. ( Exam Paper Leak)

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक