Thursday, May 21, 2026

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय सीरिजसाठी घोषित करण्यात आलेल्या संघात आता ऑलराउंडर अनुकूल रॉय (Anukul Roy) याचा समावेश करण्यात आला आहे. याआधी विदर्भाचा युवा खेळाडू हर्ष दुबेला भारत- ए संघात संधी देण्यात आली होती . मात्र आता त्याच्या जागी अनुकूल रॉयला संधी देण्यात आली आहे.

हर्ष दुबे का बाहेर झाला?

हर्ष दुबेला का बाहेर करण्यात आले असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून होत आहे. याबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. आयपीएल संपल्यानंतर अफगाणिस्तान संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात एक कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. निवड समितीने हर्ष दुबे याची या दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियात निवड केली आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारत अ संघात अनुकूल रॉयला संधी देण्यात आली आहे.

अनुकूल रॉयची कामगिरी

अनुकूल सध्या कोलकाता नाईट रायडर्स कडून आयपीएल 2026 खेळत आहे. त्याने या हंगामात: 13 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या आहेत तर फलंदाजीत त्याने 43 धावा केल्या आहेत. तसेच देशतर्गंत क्रिकेटमध्ये (List-A) त्याने 1279 धावा आणि 59 विकेट्स घेतल्या आहेत.

इंडिया A सुधारित संघ

ट्राय सीरिजसाठी इंडिया ए सुधारित टीम : तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, सुर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान आणि अनुकुल रॉय.

9 जूनपासून श्रीलंकेत सुरू होणाऱ्या या ट्राय सीरिजमध्ये इंडिया अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ संघ आमनेसामने येणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा