फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच ब्राझीलला मोठा धक्का बसला आहे. स्टार फुटबॉलपटू नेमार पुन्हा जखमी झाला आहे. त्याची नुकतीच ब्राझीलच्या विश्वचषक संघात निवड झाली होती. सँटोसचा हा स्टार फुटबॉलपटू पोटरीच्या दुखापतीमुळे बुधवारी सॅन लोरेन्झोविरुद्धचा आपल्या संघाचा घरच्या मैदानावरचा कोपा सुदामेरिकाना सामना खेळू शकला नाही. पण, ब्राझीलच्या क्लबने नेमारची दुखापत गंभीर असल्याचे म्हटलेले नाही. सँटोस संघाचे डॉक्टर रॉड्रिगो झोगाइब यांनी सांगितले की, हा फॉरवर्ड फुटबॉलपटू २७ मे रोजी होणाऱ्या ब्राझीलच्या विश्वचषकापूर्वीच्या पहिल्या सराव सत्रासाठी तयार असेल.
ICC : भारत अफगाणिस्तान यांच्यात आयपीएल संपल्यानंतर एक कसोटी सामना आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या ...
Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano ...
नेमारला पेले यांच्या पंक्तीत सामील होण्याची आणि चार वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये ब्राझीलची १० क्रमांकाची जर्सी परिधान करणारा दुसरा फुटबॉलपटू बनण्याची संधी देखील आहे. नेमारने विश्वचषकात १३ सामने खेळून आठ गोल केले आहेत आणि तीन असिस्ट दिले आहेत. ब्राझील आपल्या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात १३ जून रोजी न्यू जर्सीमध्ये मोरोक्कोविरुद्ध करेल, त्यानंतर गट 'क' मध्ये हैती आणि स्कॉटलंडविरुद्ध सामने होणार आहेत.





