डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत शोकाकुल आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे डहाणूतील बापूगाव गावावर दुःखाचे मोठे सावट पसरले असून, संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या सामूहिक अंत्यविधीच्या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्वतः उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली व पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले.अंत्यविधीदरम्यान संपूर्ण बापूगाव आणि परिसरातील नागरिक भावुक झाले होते. ग्रामस्थांचे अश्रू थांबत नव्हते. बापूगावच्या सरपंचांनीही यावेळी अश्रूंना वाट मोकळी करून देत, या अत्यंत गरीब आणि गरजू मृत कुटुंबांना शासनाने तातडीने मोठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.
मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि परिणामकारक निचरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने ...
परिसरात हळहळ
या सामूहिक अंत्यसंस्काराला मृतांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती. यामध्ये खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावीत, आमदार विनोद निकोले, माजी आमदार विलास तरे स्थानिक नेते भरत राजपूत, जिल्हाधिकारी, एटीसी अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भीषण अपघाताने केवळ बापूगावच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्हा हादरला आहे. पीडित कुटुंबांना या अथांग दुःखातून सावरण्यासाठी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थाही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.






