कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth) यूएस ओपन स्पर्धेत केवळ आपल्या खेळानेच नव्हे, तर खिलाडूवृत्तीनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कॅलिफोर्नियातील टायटन जिममध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात श्रीकांतने जपानच्या युदाई ओकिमोतोवर २२-२०, १५-२१, २१-१९ असा विजय मिळवला. या विजयासह श्रीकांतने गेल्या नोव्हेंबरनंतर प्रथमच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
ठाणे/भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी भिवंडी परिसरात ...
सामन्याच्या निर्णायक सेटमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आला. नेटजवळच्या एका एक्सचेंजमध्ये श्रीकांतने केलेला शॉट इन (आत) असल्याचे पंचांनी घोषित केले. मात्र, रिप्लेमध्ये शटल लाईनच्या बाहेर पडल्याचे दिसत होते. ओकिमोतोने पंचांच्या निर्णयाला विरोध करत रिव्ह्यूची मागणी केली, परंतु ती फेटाळली गेली. ओकिमोतो हताश झालेला असताना, श्रीकांतने स्वतः पुढाकार घेतला आणि पंचांना धावपट्टीच्या बाहेर पडलेल्या शटलबाबत माहिती दिली. त्यानंतर पंचांनी आपला निर्णय बदलून ओकिमोतोला गुण दिला. श्रीकांतच्या या खिलाडूवृत्तीचे उपस्थित प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात कौतुक केले.
सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय ...
७२ मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या लढतीत श्रीकांतने पहिल्या गेममध्ये २०-२२ असा विजय मिळवला, तर ओकिमोतोने(Okimoto) दुसऱ्या गेममध्ये १५-२१ ने पुनरागमन केले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळाली. श्रीकांतने १८-१३ अशी आघाडी घेतली होती, परंतु ओकिमोतोने जोरदार कमबॅक करत १८-१८ अशी बरोबरी साधली. अशा तणावाच्या क्षणी संयम राखत श्रीकांतने २१-१९ ने गेम जिंकून सामना आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत आता श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या 'सु ली यांग'शी होणार आहे, ज्याने दुसऱ्या उपांत्य सामन्यात रौनक चौहानला २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. बऱ्याच कालावधीनंतर वैयक्तिक विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने श्रीकांत रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी) अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.






