यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे. वैदिक पंचांगानुसार यावेळी वटपौर्णिमा सोमवारी आली आहे. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जात असल्याने पौर्णिमा तिथी आणि सोमवार यांचा संयोग अत्यंत शुभ मानला जात आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा आणि व्रत अधिक फलदायी ठरते, अशी धार्मिक मान्यता आहे.
वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. तसेच शिव-पार्वतीचे पूजन आणि सत्यवान-सावित्रीच्या कथेचे श्रवण किंवा वाचन करण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. (Vat Purnima Puja Muhurat)
सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पर्यावरण संवर्धन, हवामान बदलावर प्रभावी नेतृत्व आणि शाश्वत विकासासाठी दिल्या जाणाऱ्या सेशेल्सच्या ...
यंदा पौर्णिमा आणि सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे भगवान शिव आणि चंद्रदेव यांची कृपा मिळते, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण कलांनी युक्त असल्याने मनःशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस शुभ मानला जातो.
वैदिक पंचांगानुसार २९ जून २०२६ रोजी सकाळी ६:३० ते दुपारी १२:३० या वेळेत वटपौर्णिमेची पूजा करणे शुभ मानले जात आहे. या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केल्यास अखंड सौभाग्य आणि कुटुंबात सुख-समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे.
- डॉक्टरांनी महत्वाची बातमी Fairness Cream : गोरं दिसण्याच्या हव्यासापोटी फेयरनेस क्रीमचा सर्रास वापर करणाऱ्यांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्वचा गोरी ...
वटपौर्णिमा हा सण केवळ धार्मिक परंपरा जपणारा नसून कुटुंबातील विश्वास, निष्ठा आणि परस्पर आदर यांचे महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणूनही ओळखला जातो.






