Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद


मुंबई : मुख्यमंत्री असताना 'वर्क फ्रॉम होम' करत केवळ फेसबुक लाईव्ह पुरतेच मर्यादित राहिलेले 'उबाठा' प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभार आता अधिकृत आकडेवारीसह चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वात कमी उपस्थित राहण्याचा एक नवा लाजीरवाणा विक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत ठाकरे सभागृहात केवळ ४२ दिवसच फिरकले, त्यांची उपस्थिती जेमतेम ३१.५८ टक्के इतकीच होती. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उबाठा प्रमुखांचे हे सुमार 'प्रगतीपुस्तक' समोर आल्यामुळे उबाठा गटाची प्रचंड नाचक्की झाली आहे.



उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच म्हणजेच १३ मे २०२६ रोजी संपला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते. मात्र, २०२२ मध्ये जवळपास ४० आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून उठाव केला आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचले. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ते मंत्रालयात आणि विधिमंडळात कधी जातच नव्हते. मात्र, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तरी ते आमदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, समोर आलेल्या आकडेवारीने त्यांच्या अकार्यक्षम वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.



१३३ पैकी तब्बल ९१ बैठकांना गैरहजर :


जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत झालेल्या विधानपरिषदेच्या एकूण १३३ बैठकांपैकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ ४२ बैठकांनाच हजेरी लावली आहे, तर तब्बल ९१ बैठकांमध्ये ते अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात तर त्यांनी केवळ एकदाच तोंड दाखवले. एवढेच नव्हे तर, नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील १६ बैठकांपैकी ते केवळ चार बैठकांना उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांशी आणि सभागृहाच्या कामकाजाशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, हेच उबाठा प्रमुखांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



कोणाची किती उपस्थिती?


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ६ वर्षांच्या कार्यकाळात ९६.५० टक्के उपस्थिती लावून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी ९३ टक्क्यांहून अधिक बैठकांना हजेरी लावली. विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी आपल्या १८ पैकी १३ अधिवेशनांमध्ये १०० टक्के उपस्थितीचा विक्रम केला आहे. (Uddhav Thackeray)

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Ashok Kharat Case : मोठी अपडेट ! भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम बाजू मांडणार

Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि