IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधील दोन हॉस्टेल मेस परवाना नसताना सुरू असल्याचे आढळल्याने त्या तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मुंबईतील चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, पाच ठिकाणी व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.


FDAने 4 ते 6 ऑगस्टदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅन्टीन अशा एकूण 10 खाद्य आस्थापनांची तपासणी केली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. (IIT Bombay Hostel Canteen)



IIT Bombayच्या दोन मेस बंद :


आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधील हॉस्टेल मेस संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी तीन मेसची तपासणी केली. यावेळी Hostel No. 1 आणि Hostel No. 3 मधील मेसकडे अनिवार्य अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळून आले.


Food Safety and Standards Act, 2006 अंतर्गत आवश्यक परवाना नसल्याने या दोन्ही मेसना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, Hostel 12, 13 आणि 14 मधील मेस चालवणाऱ्या Annapurna Catering Servicesकडे वैध राज्यस्तरीय परवाना असल्याचे तपासणीत आढळले. मात्र, अन्नसुरक्षा नियमांमधील काही त्रुटी आढळल्याने संबंधित कंत्राटदाराला Improvement Notice बजावण्यात आली आहे. (IIT Bombay Hostel Canteen)



मुंबईतील 'या' चार आस्थापनांचे परवाने निलंबित :


FDAच्या कारवाईत चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये ईट निनो प्रा. लि. (Eat Nino Pvt. Ltd.) – दादर, जय माँ काली ढाबा (Jai Maa Kali Dhaba) – अंधेरी पश्चिम, ए जे हॉस्पिटॅलिटी – हाऊस ऑफ महाराष्ट्र (A J Hospitality – House of Maharashtra) – सांताक्रूझ पश्चिम
दक्षिण भारतीय डोसा कॉर्नर (South India Dosa Corner) – कुर्ला पश्चिम यांचा समावेश आहे.


तपासणीदरम्यान काही ठिकाणी अस्वच्छ स्वयंपाकघर, झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष, अन्न आणि पाण्याच्या तपासणीच्या नोंदींचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळल्या. याशिवाय FoSTaC प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी नसणे, अन्नाची अयोग्य साठवणूक, खाद्यपदार्थांसाठी अन्न-सुरक्षित नसलेल्या पॅकेजिंगचा वापर आणि गंजलेली उपकरणे यांसारख्या त्रुटीही आढळल्या. (IIT Bombay Hostel Canteen)



आधी नोटीस देऊनही सुधारणा नाही :


South India Dosa Cornerविरोधात यापूर्वीही सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक सुधारणा न केल्याचे तपासणीत आढळल्याने या आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला. FDAच्या अधिकाऱ्यांनी खाद्य आस्थापनांनी Good Manufacturing Practices (GMP) आणि Good Hygiene Practices (GHP) यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.



'या' ठिकाणी व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा :


आयआयटी बॉम्बे (IIT Bombay)च्या दोन मेसव्यतिरिक्त आणखी काही आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये Maroosh (मारूश) – प्रभादेवी, Chathradharr Caterers (छत्रधार कॅटरर्स) – एमएमआरडीए आणि बीकेसी कार्यालय, तसेच (विजयदीप महिला औद्योगिक उत्पदक सहकारी संस्था मर्यादीत) Vijaydeep Mahila Audyogik Utpadak Sahakari Sanstha Maryadit – गोवंडी यांचा समावेश आहे.


विशेष म्हणजे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील MMRDA कार्यालयातील Chathradharr Caterersविरोधातही FDAने कारवाई करत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे. (IIT Bombay Hostel Canteen)



सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब :


FDAच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी अन्नाच्या गुणवत्तेसह ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने गंभीर मानल्या जात आहेत. त्यामुळे Food Safety and Standards Act, 2006 आणि Food Safety and Standards (Licensing and Registration of Food Businesses) Regulations, 2011 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. (IIT Bombay Hostel Canteen)


मुंबईतील खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छता, परवाना आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी FDAकडून पुढील काळातही तपासणी आणि कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर