Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत होणारा खोळंबा आणि तुफान गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी 'मुंबई मेट्रो वन'तर्फे १० ऑगस्ट २०२६ पासून एक विशेष 'मिक्स्ड-लूप' सेवा सुरू केली जात आहे. या नव्या उपक्रमामुळे सर्वाधिक गर्दी असलेल्या अंधेरी ते घाटकोपर दरम्यान ट्रेनची वारंवारिता थेट ३ मिनिटांवर येणार असून, दररोज हजारो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.



काय आहे ही 'मिक्स्ड-लूप' सेवा ?



नव्या नियोजनानुसार, सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा दोन भागांत विभागली जाईल. यात एक ट्रेन केवळ अंधेरी ते घाटकोपर या प्रवाशांची तुफान गर्दी असणाऱ्या टप्प्यात धावेल, तर तिच्या पाठोपाठ येणारी पुढील ट्रेन नेहमीप्रमाणे वर्सोवा ते घाटकोपर या संपूर्ण मार्गावर धावेल. यामुळे सर्वात जास्त प्रवासी रहदारी असलेल्या अंधेरी-घाटकोपर पट्ट्यात गाड्यांची उपलब्धता वाढेल. ही शॉर्ट-लूप सेवा सायंकाळी ६:२३ वाजता अंधेरीच्या डाउन प्लॅटफॉर्मवरून सुरू होईल आणि रात्री ८:२३ वाजेपर्यंत कार्यरत राहील.



प्रवाशांना मिळणारे प्रमुख फायदे



  • अंधेरी ते घाटकोपर दरम्यान दोन गाड्यांमधील अंतर ३ मिनिटे २० सेकंदांवरून कमी होऊन अवघे ३ मिनिटे होईल. यामुळे मेट्रोची प्रवासी वहन क्षमता २० टक्क्यांनी वाढणार असून, दररोज तब्बल २८,००० अतिरिक्त प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल.

  • आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत (Mon-Fri) धावणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या आता ४७६ वरून वाढून ४८४ होतील.

  • मेट्रो मार्गिकेवरील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी अंधेरी ते घाटकोपर या टप्प्यातच प्रवास करतात. त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा या अथांग गर्दीला होईल.
    वर्सोवा ते आझाद नगर दरम्यान या वेळेत ट्रेनचे अंतर सुमारे ३६२ सेकंद म्हणजेच ६ मिनिटांचे असेल.


पायाभूत सुविधांचा कार्यक्षम वापर


मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्यामंतक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध पायाभूत सुविधांचा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करून प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित व सोयीस्कर सेवा देणे हा या मिक्स्ड-लूप पद्धतीचा मुख्य उद्देश आहे. मेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या प्रवासाच्या पॅटर्नचा सातत्याने अभ्यास केला जात असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आगामी काळातही असे ग्राहक-केंद्रित बदल केले जातील.

Comments
Add Comment

Crime News : मुंबईत तरुणाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडले; आरोपीला अटक

मुंबई : मुंबईतील धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या

Central Railway : मध्य रेल्वेवर रविवारी ३० ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक; अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार, ट्रान्स-हार्बर सेवाही बंद

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३०

Orry broke his silence on dispute : "माझ्यासाठी तो काळ नरकासारखा होता"; ओरीच साराच्या आईसोबत काय वाकड ? सारा सोबतची मैत्रीही तुटली, धक्कादायक खुलासे

मुंबई : सोशल मीडिया स्टार ओरहान अवत्रामणी म्हणजेच सर्वांचा लाडका 'ओरी' (Orry) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित

Disha Salian death case : १४ व्या मजल्यावरून पडूनही दिशा सालियनच्या अंगावर जखमा कशा नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, निकाल ठेवला राखून मुंबई : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही