Mexico Puebla Shooting : मेक्सिकोच्या प्युएब्लामध्ये गोळीबार; एका अल्पवयीन मुलासह १० जणांचा मृत्यू

मेक्सिको : मेक्सिकोमधील पुएब्ला राज्यात झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात (Mexico Puebla Shooting) किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने रविवारी या घटनेची अधिकृत पुष्टी केली. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.


मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हा हल्ला पुएब्ला (Mexico Puebla Shooting) राज्यातील तेहुइत्झिंगो नगरपालिका परिसरात घडला. येथे सशस्त्र हल्लेखोरांनी नागरिकांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.



घटनेनंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले आहे. राज्याच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने स्पष्ट केले की, या सामूहिक हत्याकांडातील आरोपींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल आणि “शून्य दंडमुक्ती” धोरणांतर्गत त्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. (Mexico Puebla Shooting)





या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गुप्तचर विभाग आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. राज्य आणि संघीय तपास संस्थांनी संयुक्त मोहीम सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. (Mexico Puebla Shooting)



दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून मेक्सिकोतील अनेक राज्यांमध्ये संघटित गुन्हेगारी, टोळी युद्धे आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. (Mexico Puebla Shooting)

Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.