Monday, May 18, 2026

Silver Price : चांदी आणखी महाग होणार? सरकारच्या मोठ्या निर्णयानंतर दरवाढीची शक्यता

Silver Price : चांदी आणखी महाग होणार? सरकारच्या मोठ्या निर्णयानंतर दरवाढीची शक्यता

- गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे

मुंबई : तुम्ही चांदीमध्ये (Silver Price) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात किंवा दागिन्यांची खरेदी करण्याची तयारी करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. भारत सरकारने चांदीच्या आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील चांदीच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत चांदीचे दर आणखी वाढू शकतात.

सरकारने १६ मे २०२६ पासून ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या (Silver Price) चांदीच्या विटा (सिल्ल्या) आणि अर्ध-निर्मित चांदीच्या उत्पादनांच्या आयातीला “Restricted Category” मध्ये टाकले आहे. यामुळे आता पूर्वीसारखी मुक्त आयात शक्य राहणार नाही. विशेष म्हणजे, भारताच्या एकूण चांदी आयातीत या प्रकारांचा वाटा जवळपास ९० टक्के असल्याने बाजारात याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी सोन्यावरील आयात शुल्क वाढवले होते आणि ड्युटी-फ्री मर्यादांमध्ये बदल केले होते. आता चांदीबाबतही (Silver Price) कठोर पावले उचलण्यात आल्याने मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

या निर्णयामागे देशावरील वाढता आयात खर्च हे प्रमुख कारण मानले जात आहे. मध्य-पूर्वेतील तणाव, डॉलरची वाढती ताकद आणि रुपयाची घसरण यामुळे भारताच्या आयात बिलात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकार परकीय चलन साठ्यावरचा दबाव कमी करण्यासाठी आयात नियंत्रणाचे धोरण अवलंबत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (Silver Price)

व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताने चांदीच्या (Silver Price) आयातीवर तब्बल १२ अब्ज डॉलर खर्च केले. याआधीच्या आर्थिक वर्षात हा खर्च केवळ ४.८ अब्ज डॉलर होता. म्हणजेच अवघ्या एका वर्षात चांदी आयातीवरील खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.

एप्रिल २०२६ मध्ये चांदीच्या आयातीत (Silver Price) १५७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात आयातीचे मूल्य ४११ दशलक्ष डॉलर होते. भारत मुख्यतः संयुक्त अरब अमिराती (UAE), युनायटेड किंगडम (UK) आणि चीनमधून मोठ्या प्रमाणावर चांदी आयात करतो.

LKP सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च तज्ज्ञ जतीन त्रिवेदी (Jatin Trivedi) यांनी स्पष्ट केले की, “सरकारने चांदीची आयात (Silver Price) पूर्णपणे बंद केलेली नाही. मात्र आता आयात प्रक्रिया अधिक नियंत्रित करण्यात आली आहे.”

त्यांच्या मते, आता चांदीची आयात फक्त खालील माध्यमांतूनच केली जाऊ शकते:

- आरबीआयशी संलग्न बँका - डीजीएफटी (DGFT) मान्यताप्राप्त संस्था - बुलियन एक्सचेंजशी जोडलेल्या अधिकृत एजन्सीज

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा कमी होऊ शकतो. परिणामी चांदीवरील (Silver Price) प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच ग्राहकांना चांदीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. विशेषतः दागिने, चांदीची भांडी आणि गुंतवणुकीसाठी चांदी खरेदी करणाऱ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारावर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. भारत हा चांदीचा मोठा ग्राहक असला तरी जागतिक किमती ठरवणारा प्रमुख घटक नाही. (Silver Price)

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सरकारचे हे पाऊल केवळ चांदीपुरते (Silver Price) मर्यादित नाही. परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे, डॉलरचा बाहेर जाणारा प्रवाह कमी करणे आणि आयात नियंत्रणात ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

सध्या भारतातील चांदीचे दर पुढीलप्रमाणे आहेत :

१ किलो चांदी – ₹२.८० लाख १०० ग्रॅम – ₹२८,००० १० ग्रॅम – ₹२,८०० १ ग्रॅम – ₹२८०

विशेष म्हणजे, मे २०२६ महिन्यात आतापर्यंत चांदीच्या किमतींमध्ये (Silver Price) जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चांदीत गुंतवणूक करावी की थांबावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >