सार्वजनिक रस्ते नागरिकांसाठी, धार्मिक कार्यांसाठी नव्हे
उत्तर प्रदेशातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण देताना योगींनी स्पष्ट केले की, सार्वजनिक रस्ते हे केवळ नागरिकांच्या वाहतुकीसाठीच राखीव आहेत. ते म्हणाले, "देशभरातून अनेक जण मला आश्चर्याने विचारतात की, उत्तर प्रदेशमध्ये खरोखरच रस्त्यावर नमाज पठण बंद झाले आहे का? यावर माझे ठाम उत्तर असते की, होय, आमच्या राज्यात रस्त्यांवर नमाज अदा करण्याची अजिबात परवानगी नाही. कुणालाही शंका असेल तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन खात्री करावी." रस्ते अडवून सर्वसामान्य जनतेची, रुग्णवाहिकांची आणि अत्यावश्यक सेवांची कोंडी करण्याचा अधिकार कोणत्याही गटाला किंवा समुदायाला नाही. ज्या धार्मिक विधींसाठी जी प्रार्थनास्थळे निश्चित केली आहेत, तिथेच ते पार पडले पाहिजेत, यावर त्यांनी विशेष भर दिला.View this post on Instagram
जागेअभावी नियम मोडता येणार नाहीत
प्रार्थनास्थळांवरील जागेच्या अभावामुळे रस्त्यावर यावे लागते, या युक्तिवादावरही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, "काही लोकांनी माझ्याकडे तक्रार केली की आमची लोकसंख्या जास्त असल्याने मशिदीत जागा पुरत नाही आणि नाइलाजाने रस्त्यावर नमाज पढावी लागते. यावर मी त्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत सुचवले आहे की, जागा अपुरी असेल तर तुम्ही एकाच वेळी गर्दी न करता वेगवेगळ्या 'शिफ्ट्स' (टप्प्यांमध्ये) नमाज अदा करू शकता. जर तुमच्याकडे मोठी जागा नसेल, तर गर्दीवर नियंत्रण ठेवणे ही सर्वस्वी तुमचीच जबाबदारी आहे. तुम्हाला जर समाजाचा आणि इथल्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून राहायचे असेल, तर संविधानाने आखून दिलेल्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल."
Mexico Puebla Shooting : मेक्सिकोच्या प्युएब्लामध्ये गोळीबार; एका अल्पवयीन मुलासह १० जणांचा मृत्यू
मेक्सिको : मेक्सिकोमधील पुएब्ला राज्यात झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात (Mexico Puebla Shooting) किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या ...






