इराण आणि अमेरिका (Iran - America War) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. ४० दिवसांच्या युद्धविरामाची स्थिती असली तरी दोन्ही देशांमधील संघर्ष पूर्णपणे थांबलेला नाही. अशातच इराणकडून अमेरिकेला देण्यात आलेल्या तीव्र इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
- गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे मुंबई : तुम्ही चांदीमध्ये (Silver Price) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात किंवा दागिन्यांची खरेदी करण्याची तयारी करत आहात? तर ...
रेजाई यांनी दावा केला की, अमेरिकेची (Iran - America War) घेराबंदी जितकी जास्त काळ कायम राहील तितका त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होईल. विशेषतः तेल वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. “हा तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक चर्चा सुरू आहेत, मात्र अमेरिकेने प्रामाणिक भूमिका घेणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही इराणला कठोर इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणकडे आता फार कमी वेळ उरला आहे. त्यांनी अमेरिकेच्या शांतता प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तिथे काहीही शिल्लक राहणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे. (Iran - America War)
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (Air India Express) विमानसेवेला ...
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणसमोर (Iran - America War) चर्चेसाठी पाच प्रमुख अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करणे, केवळ एकच अणु केंद्र सुरू ठेवणे, नुकसानभरपाईची मागणी मागे घेणे, सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवणे आणि इराणची जप्त मालमत्ता गोठवून ठेवण्याचा प्रस्ताव यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. या भागात तणाव वाढल्यास जागतिक तेल बाजार, इंधन दर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्षाकडे (Iran - America War) संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. बुरोंडी ...






