साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार


सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात तब्बल पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले , खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष राजू भोसले ग्रामविकास विभागा चे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१६ ते २०२२ या कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यानंतर नव्याने अनेक गरजू कुटुंबांची नावे समोर आल्याने आणखी ३० लाख घरांची गरज निर्माण झाली. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वितरण होणार आहे.
राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या सहकार्याने त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही केंद्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात यश आले असून, हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.


कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचाही उल्लेख करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. “हे सरकार सर्वसामान्य, शेतकरी आणि कामगारांचे सरकार आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना देशहितासाठी ऊर्जा बचतीचे आवाहन केले.विक्रमी वेळेमध्ये ग्रामविकास विभागाने पाच लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल ग्रामविकास विभाग त्या विभागाचे तत्कालीन सचिव आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केले .ग्रामविकास विभागाचे मंत्री जयकुमार यांनी घरकुल उद्दिष्ट पूर्तीचे शिव धनुष्य यशस्वीपणे पेलले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले .


शिवराज सिंह चौहान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील संपूर्ण जनतेला सुखकर जीवनासाठी वाक्या घरांचे महत्त्वकांक्षी उद्दिष्ट हातात घेतले असून महाराष्ट्रातील प्रशासन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्या घराच्या माध्यमातून पोहोचत आहे .पुढील वर्षी 15 लाख घरांचे वितरण कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने पुन्हा लाडक्या भावांचे आणि बहिणींचे अर्ज मागविण्यात येत आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याची ग्रामविकास विभाग सातत्याने कार्यरत आहोत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी संघटितपणे एकत्र काम करूया पुढच्या वेळेला पुन्हा येथे कार्यक्रमासाठी येण्याकरता मला नक्की आवडेल असे कौतुक उद्गार शिवराज सिंह चौहान उर्फ मामाजी यांनी काढले .


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले महाराष्ट्राला 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले होते .पैकी पाच लाख घरांचे विक्रमी वेळेमध्ये करण्यात आलेले वितरण यामध्ये ग्रामविकास विभागाचे सर्व प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्या संघटित प्रयत्नाला यश आले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला काही काटकसरीचे मंत्र दिले असून त्याची अंमलबजावणी करणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानुसार पुढील वर्षी 15 लाख घरांची बांधणी करून त्याच्याही घरांचे वितरण तातडीने करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास यंत्रणा कधीही कमी पडणार नाही .महाराष्ट्रात एकही माणूस बेघर राहणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आपण सामूहिकपणे सत्यात उतरवून याकरिता सातत्याने आपण सक्रिय राहू असे कळकळीचे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले .


केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रामविकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे 9000 कोटी रुपयांचा धनादेश यावेळी प्रदान केला .भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने व ग्रामविकास विभागाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली .तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास यंत्रणेने महत्त्वाकांक्षी राबवलेल्या प्रकल्पांची माहिती पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले



पालकमंत्री शंभूराज देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीने रवाना


जिल्हा परिषदेच्या सदस्य निवडी वेळी महायुतीचे घटक पक्ष असणारे भाजप व शिवसेना यांच्यात राजकीय रणकंदन माजले होते या रणकंदनाचा कोणताही प्रतिकूल परिणाम घरकुल सोहळ्याच्या कार्यक्रमावर जाणवला नाही .शिष्टाचाराला अनुसरून पालकमंत्री शंभूराज देसाई हे सातारा सैनिक स्कूलच्या हेलीपॅड वर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोहोचले .तसेच व्यासपीठावर सुद्धा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री शंभूराजे हे आमने-सामने आले त्यांनी एकमेकांना सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनौपचारिक भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले .महायुतीचे जिल्ह्यातील धुरंदर घरकुल सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर यावेळी पाहायला मिळाले .शिवेंद्रसिंह राजे मुख्यमंत्री पालकमंत्री शंभूरा देसाई एकाच गाडीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रमाला एकत्र पोहोचल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले .सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा यशवंत एकजिनसीपणा यावेळी प्रकर्षाने दिसून आला .



खासदार उदयनराजे भोसले सुद्धा व्यासपीठावर


सातारा शहराच्या सक्रिय राजकारणातून बऱ्याच काळापासून अलिप्त असलेले सातारा विकास आघाडीचे सर्वेसर्वा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आवर्जून आज घरकुल सोहळ्याच्या व्यासपीठावर उपस्थित होते .खासदार उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलन केले .यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सुद्धा आवर्जून उपस्थित होते .बऱ्याच काळानंतर जाहीर कार्यक्रमात उदयनराजे सहभागी झाल्याने खासदार गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जोरदार राजकीय बूस्टर मिळाला .सातारा नगरपालिकेच्या राजकारणातील नगरसेवकांमधील तीव्रतेने झालेले मतभेद या कार्यक्रमात कुठेही जाणवले नाहीत .



धुरंधर जया भाऊंची कार्यक्रमावर पकड


ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हा सातारा जिल्ह्यातील भाजपचा ग्रामीण चेहरा आणि तोही आक्रमक रणनीतीचा चेहरा म्हणून सातत्याने पुढे आले आहेत मानखटासारख्या दुष्काळी भागात विरोधी पक्षाला सातत्याने विशेषता राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले आहेत .ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची राजकीय वाटचाल उत्तरोत्तर प्रगल्भ होत असून राजकीय मुरब्बीपणा त्यांच्या वागण्यात जाणवू लागला आहे .या कार्यक्रम सोहळ्यात सुद्धा तो मुरब्बीपणा पदोपदी जाणवला कार्यक्रमाचे नेटके आणि काटकसरीचे संयोजन करून घरकुलांचा मास्टर स्ट्रोक लगावण्यात आणि भाजपची जिल्ह्यात मजबूत पकड निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे यश आले आहे त्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे यशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .

Comments
Add Comment

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत ठाणे : देशातील

महाराष्ट्रात भारनियमन इतिहासजमा होणार - 'मॅजेस्टिक' योजनेला मंजुरी

 जागतिक बँकेच्या सहकार्याने वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण करणार मुंबई : राज्यातील उद्योगांना आणि सर्वसामान्य

Property Card : पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही प्रत्येक घराला मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे;  मुंबई उपनगरातील ५ हजार कोटींची सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त मुंबई : पुण्याच्या

Maharashtra's Colleges : महाविद्यालयांमधील 'छुप्या' शुल्क वसुलीला चाप

प्रवेश शुल्काबाबत सर्व माहिती दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक; लपवाछपवी केल्यास कारवाई मुंबई : इयत्ता बारावीचा