Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (BMC MARD) यांनी आजपासून केईएम, लोकमान्य टिळक (सायन), नायर आणि कूपर रुग्णालयांमधील नियमित बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना तपासणी न होताच परतावे लागले, तर काहींना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागला.


महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मार्फत CCMP पात्रता प्राप्त BHMS वैद्यकीय व्यावसायिकांना नोंदणी देण्याची प्रक्रिया सुरू केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी हे आंदोलन पुकारले आहे. BMC MARD च्या मते, ही प्रक्रिया रुग्ण सुरक्षेला धोका निर्माण करणारी असून वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर परिणाम करणारी आहे.



संघटनेने CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये आणि निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने चर्चा करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.


दरम्यान, संपामुळे नियमित ओपीडी सेवा बंद असली तरी आपत्कालीन विभाग, कॅज्युअल्टी, अतिदक्षता विभाग (ICU), प्रसूती सेवा आणि आंतररुग्ण (IPD) सेवा पूर्ववत सुरू असल्याचे BMC MARD ने स्पष्ट केले आहे. (Mumbai Doctor)


संघटनेने इशारा दिला आहे की, पुढील २४ तासांत शासनाने नोंदणी प्रक्रिया स्थगित केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत रुग्णांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या