Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal) प्रकल्पाला राज्य सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटन, स्थानिक रोजगार, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.


मंत्रालयात भगवती बंदर (Bhagwati Port) येथे क्रुझ टर्मिनल विकसित करण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते (Nitesh Rane) बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, कोकण किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदरातील क्रुझ टर्मिनल हा राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील आणि रत्नागिरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल.


मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. भगवती बंदरातील अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलमुळे (cruise terminal) केवळ रत्नागिरीच नव्हे, तर संपूर्ण कोकणच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पातून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, मत्स्यव्यवसाय आणि लघुउद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांना थेट लाभ होणार असून स्थानिक उद्योजकांसाठी नव्या व्यवसायाच्या संधीही निर्माण होतील.



मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले की, प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह इतर आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी (TEFS) पूर्ण झाली असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.


यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल राखत स्थानिक जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन हा प्रकल्प साकारावा, असे निर्देशही त्यांनी (Nitesh Rane) दिले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा