Government Hospital Catering Services : सरकारी रुग्णालयांतील खानपान सेवा आता महिला बचत गटांकडे

- २०० पेक्षा कमी खाटांच्या रूग्णालयांसाठी निर्णय; पारदर्शक गुणांकनाद्वारे जिल्हा स्तरावर निवड होणार


मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील २०० पेक्षा कमी खाटा असलेल्या सर्व शासकीय, जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरवला जाणारा आहार आता स्थानिक महिला स्वयं-सहाय्यता गटांमार्फत पुरवला जाणार आहे. वैद्यकीय उपचारांसोबत रुग्णांना स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित आहार वेळेवर मिळावा, तसेच राज्य सरकारच्या महिला धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दुहेरी उद्देशाने राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात सविस्तर शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. (Government Hospital Catering Services)



या नव्या धोरणानुसार, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोंदणीकृत असलेल्या आणि अन्नप्रक्रिया किंवा आहार सेवा क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव असलेल्या महिला स्वयं-सहाय्यता गटांना या प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे. रुग्णालयाच्या स्थानिक परिसरातील गटांना सामुदायिक स्वयंपाकगृह, उपहारगृह किंवा अन्न पुरवठ्याचा अनुभव असल्यास त्यांना निवडीत विशेष गुण दिले जातील. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली ही सर्व निवड प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबवली जाणार आहे. (Government Hospital Catering Services)


महिला स्वयं-सहाय्यता गटांची निवड पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी १०० गुणांची विशेष मानांकन प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये गटाची आजवरची कामगिरी, आहार सेवा उद्योगाचा अनुभव आणि आर्थिक क्षमता या तीन मुख्य निकषांसाठी प्रत्येकी कमाल २५ गुण ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आवश्यक मनुष्यबळ कौशल्यासाठी १५ गुण आणि गटाची सामाजिक विश्वासार्हता व शिफारसींसाठी १० गुण निश्चित करण्यात आले आहेत. (Government Hospital Catering Services)



निकष काय?


गुणवत्तेच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत ८० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या पात्र महिला गटांचे अधिकृत पॅनेल तयार केले जाईल. तर ७० ते ७९ गुण मिळवणाऱ्या गटांचा समावेश प्रतीक्षा यादीत केला जाणार आहे. या निर्णयामुळे शासकीय रुग्णालयांतील आहाराचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, ग्रामीण व निमशहरी भागातील महिला गटांना शाश्वत रोजगाराची आणि आर्थिक सक्षमतेची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. (Government Hospital Catering Services)

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी