Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले आहेत.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दृढ संकल्पामुळे कलम ३७० आणि ३५A हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि संवैधानिक समानता अधिक मजबूत झाली.



मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) आणि लडाखमधील नागरिकांसाठी सुशासन, शांतता, समान अधिकार आणि सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. तसेच, 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.


फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढे सांगितले की, कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा आजही राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक समानता आणि सक्षम भारताचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या परिवर्तनकारी निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.




Comments
Add Comment

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६