मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले एक अशा एकूण १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीसोबतच वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणे आता अधिक स्पष्ट झाली आहेत.
मुंबई : जागतिक इंधन संकट आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या 'काटकसरी'च्या मंत्राची अंमलबजावणी ...
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान, भाजपने या निवडीतून प्रस्थापित बड्या चेहऱ्यांऐवजी संघटनात्मक बांधणीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. सुनील कर्जतकर (मराठवाडा), प्रमोद जठार आणि माधवी नाईक (कोकण), संजय भेंडे (विदर्भ) तर विवेक कोल्हे (उत्तर महाराष्ट्र) यांच्या रूपाने भाजपने विभागीय समतोल साधण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. कोअर कमिटीने पाठवलेली ३० नावांची यादी दिल्लीहून परतल्यानंतर निवडलेल्या या पाच नावांमध्ये प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा अचूक मेळ घालण्यात आला आहे.
शपथ घेतलेले नवनियुक्त आमदार१) डॉ. नीलम गोऱ्हे - शिवसेना २) बच्चू कडू - शिवसेना ३) अंबादास दानवे - उबाठा ४) डॉ. प्रज्ञा सातव - भाजप ५) प्रमोद जठार - भाजप ६) झीशान सिद्दीकी - राष्ट्रवादी ७) माधवी नाईक - भाजप ८) सुनील कर्जतकर - भाजप ९) विवेक कोल्हे - भाजप १०) संजय भेंडे - भाजप
संघनात्मक बळकटीकरणावर भर





