Friday, May 8, 2026

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन उद्योगाच्या आधुनिकीकरणात मोलाचे योगदान देणारे पहिल्या फळीतील मार्गदर्शक अशा उद्योजकाचे निधन भारतातील उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी आहे, अशी भावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केपीआयटी टेक्नॉलॉजीसचे संस्थापक सहअध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्व. पंडित यांनी नेहमीच उद्योजकता आणि नावीन्यता यांचा पुरस्कार केला. त्यांनी केपीआयटी टेक्नॉलॉजीसच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह, उत्पादन आणि ऊर्जा उद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात पुढाकार घेतला. ते पुणे शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासासाठी सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील राहीले. याशिवाय ते ‘जनवाणी’ सामाजिक संस्था, 'पुणे इंटरनॅशनल सेंटर', 'आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम' यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहीले. ते यूके-भारत व्यावसायिक आणि शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यात अग्रभागी होते. ज्येष्ठ उद्योजक पंडित यांच्या निधनामुळे या क्षेत्रातील अभ्यासू आणि दोन पिढ्यांदरम्यानचा दूवा असा मार्गदर्शक हरपला आहे, ही या क्षेत्राची मोठी हानी आहे. पंडित यांच्या निधनामुळे केपीआयटी उद्योग समूह आणि त्यांच्या परिवारावर आघात झाला आहे, या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा