कॅनडाच्या प्रमुख गुप्तचर संस्थेने खलिस्तानी अतिरेक्यांविरोधात गंभीर इशारा देत त्यांना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. Canadian Security Intelligence Service (CSIS) च्या २०२५ च्या सार्वजनिक अहवालात हा खुलासा करण्यात आला असून, कॅनडामधील काही गट भारताशी संबंधित हिंसक कारवायांना आर्थिक आणि संघटनात्मक मदत करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, कॅनडामध्ये कार्यरत असलेले काही खलिस्तानी अतिरेकी (CBKEs) देशातील व्यवस्थेचा वापर करून निधी गोळा करत आहेत आणि तो हिंसक कारवायांसाठी वळवत आहेत. “हे घटक कॅनडाच्या समाजात मिसळलेले असून, स्थानिक संस्थांचा वापर करून आपला अजेंडा पुढे नेत आहेत,” असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई : जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा अर्ज पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे ...
मात्र, स्वतंत्र ‘खलिस्तान’ची मागणी करणे हे कॅनडामध्ये कायदेशीर असल्याचेही CSIS ने स्पष्ट केले आहे. परंतु, हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आणि भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लहान गटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
अहवालात १९८५ मधील Air India Flight १८२ bombing चा उल्लेख करत, त्या हल्ल्यामागे अशाच अतिरेकी नेटवर्कचा हात असल्याचे नमूद केले आहे. या भीषण हल्ल्यात ३२९ जणांचा मृत्यू झाला होता, जो आजही कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना सोनं-चांदी खरेदीची आवड असते. मात्र सध्या या मौल्यवान धातूंचे दर इतक्या वेगाने चढ-उतार होत आहेत की खरेदी करताना ग्राहक ...
ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२३ मध्ये जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता, जो भारताने फेटाळला होता.
त्यानंतर दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली असून, राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करण्यात आला आहे. व्यापार, गुंतवणूक आणि कायदा अंमलबजावणी क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
होर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणने दावा केला आहे की, सोमवारी त्यांनी एका अमेरिकन ...
दरम्यान, भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल पुढील महिन्यात कॅनडाला मोठ्या व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा अहवाल अधिकच महत्त्वाचा ठरत आहे.






