Monday, May 4, 2026

Vijay Thalapathy : लाडक्या बहिणींना लग्नात मिळणार ८ ग्रॅम सोनं....

Vijay Thalapathy : लाडक्या बहिणींना लग्नात मिळणार ८ ग्रॅम सोनं....

मुंबई : लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक घोषणा केली आहे. एक आनंदाचा धक्का देणारी बातमी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे. लाडक्या बहिणींच्या लग्नात त्यांना ८ ग्रॅम सोनं मिळणार आहे.

तामिळनाडू सरकार देणार सोनं ?

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या पॅटर्नची हवा आता तामिळनाडूमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अभिनेता विजय याच्या पक्षाने मतमोजणीत आघाडी घेत, तमिळनाडू सत्तेची समीकरणे आता बदलताना दिसत आहेत. २३४ जागांमधून २०० पेक्षा जास्त जागांचे निकाल समोर आले असून विजयने आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट आहे.

तामिळनाडूमध्ये तीन पक्षात रंगली चुरस

एम. के स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके ) या पक्षाला मोठा धक्का बसला असून तामिळनाडूच्या सत्तेतून रसातळाला जाण्याचे संकेत मिळत आहेत. डीएमकेने या निवडणुकीत काँग्रेससोबत युती केली होती. मात्र दोन्ही पक्ष ढासळले असून २०० हुन अधिक जागांमध्ये त्यांना केवळ ५४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे.

एमडीआयके

ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एमआयडिके) पक्षाने देखील डीएमकेला मागे टाकले आहे. परंतु भाजपसोबत केलेल्या युतीमुळे या पक्षाने ६७ जागांवर आघाडी मिळवली आहे.

या निवडणुकीत सर्वाना मिळालेला धक्का म्हणजे अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाची कामगिरी. नव्याने स्थापन झालेल्या या पक्षाने तब्बल ८०हुन अधिक जागांवर आघाडी घेत मोठा राजकीय चमत्कार घडवला आहे.

प्रचारातील घोषणा

प्रचंड मतांनी विजय जिंकून येण्याची चिन्हे असून तामिळनाडू सरकारमध्ये विजय हा किंगमेकर ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्याच्या प्रचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या प्रचार सभांदरम्यान विजय अनेक मंदिरांना भेटी देत होता तसेच अनेक आश्वासने देखील करत होता.

यातील सर्वात महत्वाचे आश्वासन म्हणजे तामिळनाडूत राबवला गेलेला महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा पॅटर्न, विजयने प्रचार दरम्यान लाडक्या बहिणींना लग्नात ८ ग्रॅम सोनं देण्याचं आश्वासन केलं होत.

सोन देणार की नाही?

विजयचा पक्ष आता अधिक मताधिक्याने निवडून आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या गळयात सोनं पडणार की दिलेल आश्वासन हवेतच राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा