चेन्नई : अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पुदुच्चेरीमधील भाजपच्या विजयाचे कौतुक करत ते चांगल्या प्रशासनाचे फलित असल्याचे म्हटले. तर तामिळनाडूमध्ये अनेक दशकांपासून असलेल्या द्रविड पक्षाच्या वर्चस्वाला मोठे आव्हान मिळाल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती, असं चित्र समोर आलं आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी ...
हेमा मालिनी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने नव्या चेहऱ्याला म्हणजेच विजय (थलपती विजय) यांना मतदान केले. हा निकाल एक प्रकारची राजकीय त्सुनामी ठरली असून त्याचा अंदाज कुणालाही नव्हता.
Tamil Nadu Assembly Election 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ५१ वर्षीय विजय यांनी ...
दरम्यान, २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत तमिलगा वेत्री कझगम (TVK) या विजय यांच्या पक्षाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे हा विजय अधिक महत्त्वाचा ठरला आहे. हेमा मालिनी यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
विजय यांना केवळ हेमा मालिनीच नव्हे, तर नानी, टायगर श्रॉफ यांसारख्या कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्रिशा कृष्णन त्यांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचल्याचीही माहिती समोर आली आहे.






