Friday, May 1, 2026

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

Devendra Fadnavis :

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, पण भाषेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची हिंसा आम्ही स्वीकारणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. अलीकडेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

">ते म्हणाले, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. जे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे स्वागत आहे, आणि जे अजून भाषा शिकलेले नाहीत त्यांना आम्ही शिकवू.” त्यांनी यावेळी मराठी ही सुंदर आणि सोपी भाषा असल्याचे सांगत तिचा अधिकाधिक वापर व्हावा, असे आवाहन केले. भाषेच्या मुद्द्यावरून घडणाऱ्या हिंसाचारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “भाषेच्या नावावर कोणालाही मारहाण करणे किंवा हिंसा करणे हे आपल्या संस्कृतीचा भाग नाही, आणि आम्ही ते पूर्णपणे नाकारतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सार्वजनिक वाहतूक चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात विविध मतप्रवाह निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने चालकांसाठी मराठी शिकण्याची मुदत १ मे ऐवजी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. (Devendra Fadnavis)

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले,” असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत त्यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ आजही राज्यातील जनतेला एकता आणि अभिमानाची प्रेरणा देत असल्याचे सांगितले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >