मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात तब्बल ₹९९३ इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. एका दिवसात झालेली ही वाढ मागील अनेक वर्षांतील सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (LPG Gas Price Hike)
प्रमुख शहरांतील नवे दर काय?
दरवाढीनंतर काही शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर थेट ३००० रुपयांपलीकडे गेले आहेत.
- मुंबईत कालपर्यंत ₹२०३१ असलेला सिलेंडर आता ₹३०२४.५० झाला आहे - पुण्यात दर ₹३०८५ वर पोहोचला आहे - नागपुरात सिलेंडरची किंमत ₹३१२०.५० झाली आहे - दिल्लीत हा दर ₹३०७१.५० इतका झाला आहे
या वाढीमुळे खाद्य व्यवसाय चालवणाऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. (LPG Gas Price Hike)
मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या ...
दरवाढीमागचे कारण काय?
सर्वसामान्यांसाठी थोडा दिलासा :
या मोठ्या दरवाढीतही घरगुती वापराच्या १४.२ किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य कुटुंबांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. (LPG Gas Price Hike)
मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला. पर्यटकांनी भरलेली नर्मदा क्रूझ नौका खमरिया ...





