Thursday, April 30, 2026

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling) सुरू आहे. यामागे अनेक रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने भारताच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित मोठा निर्णय घेत तब्बल 657 प्राचीन वस्तू भारताला परत केल्या आहेत. या प्रकरणात प्राचीन वस्तू तस्कर सुभाष कपूर आणि नॅन्सी वीनर यांच्या नेटवर्कचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

न्यूयॉर्कमध्ये आयोजित समारंभात भारताच्या वाणिज्यदूत राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत या वस्तू अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आल्या. मॅनहॅटन जिल्हा अटर्नी यांनी या कारवाईबाबत सांगितले की, भारताच्या सांस्कृतिक वारशावर डोळा ठेवणाऱ्या तस्करी जाळ्याचा प्रभाव मोठा आहे आणि आज परत मिळालेल्या शेकडो वस्तू त्याचेच उदाहरण आहेत. (America returns 657 rare items to India)

''त्या' 657 वस्तूंची किंमत १२० कोटी रुपये'

दरम्यान, अमेरिकेने सुमारे १२० कोटी रुपये किमतीच्या सुमारे 657 दुर्मीळ आणि प्राचीन मूर्ती आणि कलाकृती भारताला परत केल्या आहेत. या 657 वस्तू तीन टप्प्यांत भारतात परत करण्यात आल्या. नोव्हेंबर 2024 मध्ये 612 वस्तू, जुलै 2025 मध्ये 26 वस्तू आणि 28 एप्रिल 2026 रोजी शेवटच्या टप्प्यात 19 वस्तू भारतात परत आल्या. यापैकी 17 वस्तू थेट सुभाष कपूरशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, अजूनही सुमारे 1000 हून अधिक प्राचीन वस्तू परत येणे बाकी असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील तपास यंत्रणांनी पुढील काळातही सहकार्य कायम ठेवून या वस्तू परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(America returns 657 rare items to India)

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ‘इंडिया प्राईड’चे सहसंस्थापक एस. विजय कुमार यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फळ आहे. त्यांनी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्सचे विशेष आभार मानत, भारतातील चोरी गेलेल्या देवतांच्या मूर्ती आणि कलावस्तू परत मिळवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. एकूणच, भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या पुनर्स्थापनेसाठी ही मोठी आणि सकारात्मक घडामोड मानली जात आहे. या कारवाईमुळे जागतिक स्तरावर कलावस्तू तस्करीविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा