मुंबई : IRCTC तर्फे भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे आयोजित पुरी – कामाख्या – बैद्यनाथ धाम यात्रा ही भाविकांसाठी एक पवित्र आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव देणारी यात्रा आहे. ही ११ रात्री / १२ दिवसांची यात्रा २५ जून २०२६ रोजी पुणे येथून सुरू होणार आहे. या यात्रेत प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यात येईल. जगन्नाथ मंदिर (पुरी), कामाख्या मंदिर (गुवाहाटी), बैद्यनाथ धाम (जसीडीह), काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी) आणि राम जन्मभूमी मंदिर (अयोध्या). या सर्व सुविधा असलेल्या पॅकेजची सुरुवात फक्त ₹२२,७७०/- प्रति व्यक्ती* पासून आहे. यात्रेसाठीची विशेष एसी/नॉन-एसी पर्यटक ट्रेन प्रवाशांना संपूर्ण भारतभर आरामदायी प्रवास घडवून आणेल तसेच त्यांना आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव देईल, असे गौरव झा, ग्रुप जनरल मॅनेजर, IRCTC पश्चिम विभाग, यांनी सांगितले. प्रवासी आपल्या सोयीप्रमाणे इकोनॉमी, स्लीपर (SL), स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC श्रेणींमधून निवड करू शकतात. सुमारे ७५० प्रवाशांची क्षमता असलेली ही ट्रेन पुणे ते नागपूर दरम्यान विविध स्थानकांवर चढणे व उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देईल. यात्रेत प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत, असे डॉ. ए.के. सिंह, प्रवक्ते, IRCTC पश्चिम विभाग, यांनी सांगितले. बुकिंग IRCTC Tourism Portal वर सुरू आहे.
पॅकेजची प्रमुख वैशिष्ट्ये:
2AC, 3AC आणि नॉन-एसी स्लीपरमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये निवास व्यवस्था (डबल/ट्रिपल/क्वाड शेअरिंग), प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन एसी/नॉन-एसी ट्रान्सफर आणि पर्यटन स्थळांचे दर्शन, संपूर्ण प्रवासासाठी विमा संरक्षण IRCTC चे अनुभवी टूर मॅनेजर
पॅकेज शुल्क:
इकोनॉमी क्लास (स्लीपर): ₹२२,७७०/- स्टँडर्ड क्लास (3AC): ₹३९,६२०/- कम्फर्ट क्लास (2AC): ₹५२,८६०/-






