आज म्हणजेच २३ एप्रिल, गुरुवारी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. बंगालमध्ये २९४ पैकी १५२ जागांवर पहिल्या टप्प्यातील मतदानात ९१.३५% मतदानाची नोंद झाली. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर विक्रमी ८४.२९% मतदान झाले.
दोन्ही राज्यांच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाची आकडेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची असून, त्यात बदल होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी, ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्येही विक्रमी मतदान झाले. आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक ८५.९१% मतदानाची नोंद झाली, पुदुचेरीमध्ये ९०% आणि केरळमध्ये १९८७ नंतरचे सर्वाधिक ७८.२७% मतदान झाले. या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील.
भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक नियम लागू केले आहेत. या नियमांचा थेट ...
कूचबिहारच्या तुफानगंज परिसरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीमार करत जमाव पांगवला. मालदामध्ये ईव्हीएम बिघाडामुळे संतप्त मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्याला घेराव घालून ओलीस धरले. तसेच हरिश्चंद्रपूरमध्ये टीएमसीच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात पक्षाच्या कॅम्प ऑफिसची तोडफोड करण्यात आली. सिलिगुरीमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. केंद्रीय दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
इराणमध्ये सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ मोठ्या चर्चेत आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ...
तृणमलू काँग्रेस अर्थात टीएमसीने बाहेरून गुंड आणल्याचा आरोप होत आहे. आसनसोल उत्तरचे उमेदवार मलय घटक यांनी पाच विशेष ट्रेनमधून बाहेरील लोकांना आणल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.





