इराणमध्ये सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार करण्यात आलेला एक व्हिडिओ मोठ्या चर्चेत आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवण्यात आली आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की हैदराबादस्थित इराणी वाणिज्य दूतावासानेही तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला.
वाणिज्य दूतावासाने व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “युद्धविराम कसा वाढवण्यात आला? हा व्हिडिओ सध्या इराणमध्ये व्हायरल होत आहे.” या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या अलीकडील निर्णयावर टोला लगावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली होती. सुमारे ४५ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एआय च्या माध्यमातून ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इतर काही जण टेबलावर बसलेले दाखवले आहेत. ते इराणच्या प्रतिनिधीमंडळाची वाट पाहत असतात.
How was the ceasefire extended? The video is getting viral in Iran. pic.twitter.com/UCldpWjZMO
— Iran In Hyderabad (@IraninHyderabad) April 22, 2026
व्हिडिओच्या शेवटी ट्रम्प यांचे व्यंगचित्र म्हणते की, पाकिस्तानच्या सांगण्यावरून ते युद्धविराम वाढवत आहेत आणि हसत खोलीबाहेर निघून जातात. प्रत्यक्षात, ट्रम्प यांनी असे विधान केले होते की पाकिस्तानच्या विनंतीवरून इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्यात आला, जेणेकरून चर्चेसाठी अधिक वेळ मिळू शकेल. तसेच, इराणच्या नेतृत्वाला युद्ध समाप्तीसाठी प्रस्ताव तयार करण्याची संधी दिली जात असल्याचेही सांगण्यात आले होते.
भारत-अमेरिका व्यापार करारावरील सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीअर यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...
मात्र, पुढील चर्चेत सहभागी होणार की नाही, याबाबत इराणने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकई यांनी सांगितले की, त्यांनी चांगल्या हेतूने चर्चा सुरू केली होती, परंतु अमेरिकेकडून अपेक्षित गांभीर्य दिसून आले नाही. तसेच, येत्या काही दिवसांत होणाऱ्या शांतता चर्चेत सहभागी व्हायचे की नाही, याबाबत इराणने अद्याप निर्णय घेतलेला नाही.






